Instagram वर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण शेअर करतो. सुट्ट्यांमध्ये घालवलेले क्षण असोत, मित्रांसोबतच्या पार्ट्या असोत किंवा कोणताही खास क्षण असो, आपण Instagram वर सर्वकाही अपलोड करतो. परंतु, या ओपन प्लॅटफॉर्मवर आपली प्रायव्हसी म्हणजेच गोपनीयता जपणंही खूप गरजेचं आहे.
कधी कधी प्रत्येकाने आपल्या Instagram पोस्ट आणि स्टोरी पाहाव्या, असे आपल्याला वाटत नाही. अशावेळी Instagram आपल्याला असे अनेक फीचर्स देते ज्याच्या मदतीने आपण आपलं Instagram अकाऊंट अधिक प्रायव्हेट करू शकतो. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.
सोशल मीडियावरील सुरक्षा ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. Instagram वर आपली प्रायव्हसी राखणे अधिकच महत्त्वाचे झाले आहे. अनोळखी लोकांनी आपल्या Instagram पोस्ट आणि स्टोरी पहाव्या, असे आपल्याला वाटत नसल्यास आपले Instagram अकाऊंट प्रायव्हेट करण्याचे काही सोपे पर्याय आहेत. तुम्ही तुमचे Instagram अकाऊंट अधिक खासगी कसे बनवू शकता. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.
आपल्या सर्व मित्रांनी आपल्या Instagram पोस्ट आणि स्टोरी पहाव्या, असे आपल्याला वाटत नसल्यास, जवळच्या मित्रांची यादी तयार करा. या यादीमध्ये तुम्ही अशा लोकांना जोडू शकता ज्यांच्यासोबत तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करू इच्छिता.
यासाठी Instagram मधील सेटिंग्जमध्ये जाऊन ‘ Close friends ‘वर टॅप करा. इथे तुम्ही अशा मित्रांची नावे निवडू शकता ज्यांच्यासोबत तुम्हाला Instagram पोस्ट किंवा स्टोरी शेअर करायची आहे.
आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीला आपली Instagram स्टोरी आणि लाईव्ह व्हिडिओ दाखवू इच्छित नसाल तर आपण ते लपवू शकता. यासाठी तुमच्या Instagram सेटिंग्जमध्ये जाऊन ‘ Who can see your content ‘ सेक्शनमध्ये जाऊन ‘ Hide story and live’ या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला लोकांना यादीत समाविष्ट करण्याचा पर्याय मिळतो.
व्हॉट्सअॅपप्रमाणेच Instagram वरही तुम्ही शेवटचे ऑनलाईन कधी होतात, हे दिसतं. आपण ते लपवू इच्छित असल्यास सेटिंग्जमधील मॅसेज आणि स्टोरी फिडबॅक सेक्शनमध्ये अॅक्टिव्हिटी बंद करा.
Instagram वर तुमचे मेसेज कधी वाचले गेले हेही तुम्ही पाहू शकता. आपण त्यांचा मॅसेज वाचला आहे हे लोकांना कळू नये, असे आपल्याला वाटत असल्यास, सेटिंग्जमधील ‘Messages and story replies’ सेक्शनमधील ‘Show read receipts’ याला डिसेबल करा.
कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्यांच्याशी संवाद मर्यादित करू शकता. असे केल्याने ती व्यक्ती तुम्हाला मेसेज, कमेंट आणि रिप्लाय देऊ शकणार नाही. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन ‘ How others can interact with you ‘ या विभागातील ‘ Limit interactions ‘ हा पर्याय निवडा. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे Instagram अकाऊंट अधिक प्रायव्हेट बनवू शकता आणि आपली प्रायव्हसी मजबूत करू शकता.