ब्लूटूथ कॉलिंगसह iOS-अँड्रायड डिव्हाईस सपोर्टेड वॉटरप्रूफ स्मार्टवॉच बाजारात
नाविन्यपूर्ण आणि पोर्टेबल डिजिटल उत्पादनांच्या बाजारपेठेत इनबेस (InBase) कंपनीचे नाव आघाडीवर आहे. (InBase launches Urban Lyf smartwatch)
मुंबई : नाविन्यपूर्ण आणि पोर्टेबल डिजिटल उत्पादनांच्या बाजारपेठेत इनबेस (InBase) कंपनीचे नाव आघाडीवर आहे. या कंपनीने त्यांचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यासाठी एक नवीन स्मार्टवॉच – ‘अर्बन लाRफ’ (Urban Lyf Smartwatch) बाजारात सादर केलं आहे. या लाँचिंगसह, इनबेसने त्यांच्या स्मार्टवॉच सेगमेंटचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन स्मार्टवॉच अनेक प्रकारे युनिक आहे आणि बाजारात उपलब्ध असलेल्या निवडक स्मार्टवॉचेसपैकी एक आहे. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंगसह (Bluetooth Calling Feature) अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच वापरणाऱ्या युजरला कॉल आल्यास त्याला खिशातून मोबाईल बाहेर काढावा लागणार नाही. या स्मार्टवॉचद्वारे युजर कॉल रिसिव्ह करु शकतोच सोबत कॉल करु शकतो. (InBase launches Urban Lyf smartwatch with bluetooth calling feature)
अर्बन लाईफ स्मार्टवॉच अनेक वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. हे स्मार्टवॉचद्वारे युजरला रक्तदाब (ब्लड प्रेशर) मोजण्याबरोबरच झोप, हृदयाचे ठोके, स्टेप काउंट, ईसीजी, ब्ल्ड ऑक्सिजन लेव्हल मोजता येते. या सर्व वैशिष्ट्यांसह सुसज्ज असे इनबेसचे स्मार्टवॉच फिटनेस अँथुजिस्ट उत्पादन म्हणून समोर आलं आहे. अर्बन लाईफ स्मार्टवॉच तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच, या स्मार्टवॉचचा बेल्ट (स्ट्रॅप) सहज बदलला जाऊ शकतो. हे स्मार्टवॉच जेट ब्लॅक केससह येतं. यामध्ये मि़डनाईट ब्लॅक बँड आहे. सिल्वर केससह दुसरं वॉच सादर करण्यात आलं आहे ज्यामध्ये फ्रॉस्ट व्हाइट बँड आहे. तर रोज गोल्ड केस आणि पिंक सालोमन बँडसह तिसरं वॉच सादर करण्यात आलं आहे.
ब्लूटूथ कॉलिंगसह अनेक दमदार फीचर्स
नवीन स्मार्टवॉच अनेक दमदार फीचर्सनी सुसज्ज आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मोजणे, कॅलरीज, ईसीजी, एसपीओ 2, ब्लड ऑक्सीजन आणि स्टेप्स काऊंट करणे असे अनेक फीचर्स आहेत. यामधील युनिक फीचर्स या स्मार्टवॉचला इतर अनेक स्मार्टवॉचपेक्षा वेगळं सिद्ध करतात. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचरही देण्यात आलं आहे. हे स्मार्टवॉच वापरणाऱ्या युजरला कॉल आल्यावर त्याला खिशातून मोबाईल काढावा लागणार नाही. या स्मार्टवॉचद्वारे युजर कॉल रिसिव्ह करु शकतोच सोबत कॉल करु शकतो. ब्लूटूथ 4.0 कनेक्टिव्हिटीसह हे स्मार्टवॉच आयओएस आणि अँड्रायड स्मार्टफोन्ससह खूप सहजपणे कनेक्ट होऊ शकतं.
- अर्बन लाईफ हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. हे वॉच आयपी 67 सर्टिफाईड आहे.
- हे स्मार्टवॉच फुल टच एचडी डिस्प्ले स्क्रीनसह सादर करण्यात आलं आहे, यामध्ये 1.75 इंचांची स्क्रीन देण्यात आली आहे.
- अर्बन लाईफमध्ये जबरदस्त बॅटरी आहे जी कॉल न करता सात दिवस चालते, तर कॉलिंग फीचरसह ही बॅटरी दोन दिवस चालते. या स्मार्टवॉचचा स्टँड अप टाईम 15 दिवसांचा आहे.
- इनबेस अर्बन लाईफ स्मार्टवॉच अर्बन अधिकृत वेबसाइटवरून 4,999 रुपये या प्रारंभिक (इंट्रोडक्टरी) किंमतीत खरेदी करता येईल.
इतर बातम्या
जबरदस्त फीचर्ससह Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, भारतात सेल कधी?
6000mAh बॅटरी, 48MP ट्रिपल कॅमेरा, कॅशबॅक ऑफरसह POCO M3 खरेदी करा
Narzo 30A सह Realme चा सर्वात स्वस्त 5G फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Motorola चा फोल्डेबल फोन 50 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या कुठून खरेदी करता येईल
(InBase launches Urban Lyf smartwatch with bluetooth calling feature)