विक्रीच्या बाबतीत iPhone 12 कडून जुने रेकॉर्ड मोडीत, ठरला बेस्ट सेलिंग 5G स्मार्टफोन
अॅपलने नुकतीच iPhone 12 सीरिजमधील स्मार्टफोन लाँच केले आहेत. जगभरात या सीरिजमधील स्मार्टफोन्सना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
मुंबई : अॅपलने नुकतीच iPhone 12 सीरिजमधील स्मार्टफोन लाँच केले आहेत. जगभरात या सीरिजमधील स्मार्टफोन्सना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. तसेच सेलच्या (विक्री) बाबतीत आयफोन 12 ने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. iPhone 12 जगातील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन म्हणजेच सर्वाधिक विक्री झालेला 5 जी स्मार्टफोन ठरला आहे. (Iphone 12 becomes worlds best selling 5G smartphone; check top 10 smartphones)
iPhone 12 या स्मार्टफोनने हुवावे, वनप्लस, सॅमसंग, ओप्पोसारख्या अनेक स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या 5 जी फोन्सना विक्रीच्या बाबततीत मागे टाकले आहे. ऑक्टोबर महिन्यात iPhone 12 या 5G स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री झाली आहे. तर iPhone 12 Pro 5G हा दुसरा सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन ठरला आहे. या स्मार्टफोन्समधील खास गोष्ट हीच की, हे स्मार्टफोन खूप महाग असूनही त्यांची जोरदार विक्री झाली आहे.
सर्वाधिक विक्री झालेले टॉप 10 5G स्मार्टफोन्स
5 जी स्मार्टफोन्सच्या विक्रीच्या बाबतीत iPhone 12 आणि iPhone 12 Pro नंतर Samsung Galaxy Note 20 Ultra तिसऱ्या स्थानावर आहे. Huawei Nova 7 5G चौथ्या नंबरवर, Huawei P40 5G पाचव्या नंबरवर, Oppo A72 5G सहाव्या नंबरवर, Huawei P40 Pro 5G सातव्या नंबरवर, Samsung Galaxy Note 20 5G आठव्या नंबरवर, Samsung Galaxy S20 Plus 5G नव्या नंबरवर आणि दहाव्या नंबरवर Oppo Reno 4 SE हे स्मार्टफोन आहेत.
आयफोन 12 आणि 12 प्रो ची किंमत
आयफोन 12 ची किंमत 79,900 रुपये इतकी आहे. यामध्ये तुम्हाला 64 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला स्मार्टफोन मिळेल. तर 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज असलेला आयफोनन 12 खरेदी करण्यासाठी तुम्हाला 84,900 आणि 94,900 रुपये मोजावे लागतील.
आयफोन 12 प्रो ची किंमत 1,19,900 रुपये आहे. या किमतीत तुम्हाला 128 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला स्मार्टफोन मिळेल. तर 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या आयफोन 12 प्रो साठी तुम्हाला 1,29,900 रुपये मोजावे लागतील. आयफोन 12 प्रो मध्ये 512 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला स्मार्टफोनदेखील लाँच करण्यात आला आहे. याची किंमत तब्बल 1,49,900 रुपये इतकी आहे.
आयफोन 12 चे फिचर्स
Apple ने आयफोन 12 पाच नवीन रंगांमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये निळा, लाल, काळा, पांढरा आणि हिरवा या रंगांचा समावेश आहे. आयफोन 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन आहे.
आयफोन 12 सिरेमिक शील्डने सुसज्ज आहे ज्यामुळे हा फोन पूर्वीपेक्षा टिकाऊ बनला आहे. आयफोन 12 हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा + 12 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्ससह लाँच करण्यात आला आहे.
आयफोन 12 मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर आयफोन 12 प्रो मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोन 12 मध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. जो वाइड आणि अल्ट्रा वाइड लेन्सने सुसज्ज आहे.
आयफोन 12 प्रो मध्ये 12 मेगापिक्सलचा F1.6 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरादेखील देण्यात आला आहे. सोबत 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!
जुना अँड्रॉइड फोन द्या अन् नवा आयफोन घ्या, ‘iPhone 12’वर तब्बल 22 हजारांचा घसघशीत ‘डिस्काउंट’!
(Iphone 12 becomes worlds best selling 5G smartphone; check top 10 smartphones)