17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा

Apple ने आयफोन 13 सिरिजच्या लाँचिंगची तारीख निश्चित केली आहे, असे म्हटले जात आहे. परंतु वापरकर्त्यांना अद्याप याबद्दल माहिती मिळालेली नाही.

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 4:43 PM

मुंबई : Apple ने आयफोन 13 सिरिजच्या लाँचिंगची तारीख निश्चित केली आहे, असे म्हटले जात आहे. परंतु वापरकर्त्यांना अद्याप याबद्दल माहिती मिळालेली नाही. पण आता एका चीनी सोशल मीडिया वेबसाईट नुसार, Apple 17 सप्टेंबरला आपला पुढील आयफोन लाइनअप लाँच करू शकते. साधारणपणे Apple कंपनी मंगळवारी लॉन्च इव्हेंट आयोजित करते आणि शुक्रवारपासून त्या उत्पादनाची विक्री सुरू होते. (IPhone 13 might be launch on September 17, AirPods 3 will come on September 30, claims in new leaks)

तसेच, पोस्टमधून हे देखील उघड झाले आहे की, कंपनी गुरुवारी, 30 सप्टेंबर रोजी थर्ड जनरेशन एअरपॉड लॉन्च करणार आहे. Weibo पोस्टवर तारीख जाहीर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये ई-कॉमर्स अॅपचे चित्र दिसत आहे, ज्यात आगामी Apple उत्पादनांची माहिती देण्यात आली आहे. अ‍ॅपच्या स्क्रीनशॉटनुसार, अॅपल 17 सप्टेंबरपासून आयफोन 13 चे चारही मॉडेल विकण्यास सुरुवात करेल. यामध्ये आयफोन 13, आयफोन 13 प्रो, आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 प्रो मॅक्सचा समावेश असेल. आयफोन लाँच केल्यानंतर, एअरपॉड्स 3 सप्टेंबरमध्ये सादर केले जातील.

Apple चं Xiaomi, OnePlus पावलावर पाऊल

Apple आता शाओमी एमआय 11 अल्ट्रा (Xiaomi Mi 11 Ultra) आणि वनप्लस 9 प्रो (OnePlus 9 Pro) या अँड्रॉइड फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या पावलावर पाऊल टाकणार आहे. कंपनी iPhone 13 Series 12Hz ProMotion डिस्प्लेसोबत लाँच करु शकते. MacRumors ने DigiTimes च्या रिपोर्टचा हवाला देत म्हटले आहे की, अॅपल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max साठी LTPO (लो-टेम्परेचर पॉलिक्रिस्टलाइन ऑक्साइड) डिस्प्लेचा वापर केला जाणार आहे. सॅमसंग आणि एलजी डिस्प्ले LTPO OLED पॅनलचे प्रमुख सप्लायर्स आहेत. दुसऱ्या बाजूला vanilla iPhone 13 आणि iPhone 13 mini स्मार्टफोन 60Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह लाँच केले जाऊ शकतात.

डिस्प्लेमध्ये बदल

iPhone 13 ची एक इमेज समोर आली आहे. iPhone 13 चा डिस्प्ले नॉच पूर्वीपेक्षा लहान असेल. असंच डिझाईन iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या सर्वच स्मार्टफोन्समध्ये दिलं जाणार आहे. iPhone 13 आणि iPhone 13 Pro मध्ये 6.1 इंचांचा डिस्प्ले दिला जाईल. तर iPhone 13 Pro Max मध्ये 6.7 इंचांची स्क्रीन दिली जाऊ शकते. तसेच iPhone 13 mini स्मार्टफोन iPhone 12 mini प्रमाणे 5.4 इंचांच्या डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो.

या स्मार्टफोन्सबद्दलच्या अहवालानुसार, आयफोन 13 प्रो चा नॉच 5.35 मिमी लांबीसह दिला जाऊ शकतो, तर आयफोन 12 प्रोमध्ये हा नॉच 5.30 मिमी लांबीसह आहे. दुसरीकडे, आपण जर या फोनच्या रुंदीबद्दल बोलायचे झाल्यास या नवीन आयफोनची रुंदी 26.8 मिमी इतकी असेल, तर आधीच्या आयफोन 12 प्रोची रुंदी 34.83 मिमी इतकी होती.

नव्या Iphone मध्ये पंचहोल डिझाईन मिळणार

आयफोन एक्स मध्ये नॉच सादर केल्यानंतर, आयफोनचा नॉच थोडा लहान केला जाणार आहे. नॉच लहान करण्यासाठी कंपनीने ईयरपीस टॉप बेजेल वरच्या बाजूला सरकवलं आहे. असं म्हटलं जातंय की, अॅपल कंपनी 2022 मध्ये काही ठराविक iPhone मॉडेल्समध्ये पंच होल डिझाईन देऊ शकते. जो Samsung Galaxy S21 Ultra प्रमाणे असेल. तसेच फेस आयडीऐवजी कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. कंपनी iPhone 13 सिरीज फास्टर A15 चिप, इम्प्रूव्ह्ड कॅमेरा आणि मॅट ब्लॅकसह नवीन रंगांमध्ये सादर करु शकते.

इतर बातम्या

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(IPhone 13 might be launch on September 17, AirPods 3 will come on September 30, claims in new leaks)

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.