iPhone | iPhone 13 तुम्ही म्हणाल एवढ्या स्वस्तात, विश्वास नाही होणार, पण तुम्ही म्हणाल, ‘आता घेऊनच टाकतो’
iPhone | iPhone 13 खरेदी करायचा, तर हीच ती वेळ. तुमची प्रतिक्षा फळाला आली आहे. कारण Apple ने किंमतींमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन किंमत ऐकून तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही.
iPhone | iPhone 13 खरेदी करायचा, तर हीच ती वेळ. तुमची प्रतिक्षा फळाला आली आहे. कारण Apple ने किंमतींमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन किंमत ऐकून तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. तुमच्या खास बजेटमध्ये हा हँडसेट (Handset) तुम्हाला मिळणार आहे.
इतकी असेल किंमत
एक वर्ष जुन्या iPhone 13 च्या किंमतीत देशात कपात करण्यात आली आहे. हा फोन ग्राहकांना 69,900 रुपयांना मिळेल. Apple ने अधिकृतपणे याविषयीची घोषणा केली. या किंमती लॉचिंग किंमतीच्या 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. थर्ड पार्टी रिसेलर्संनी iPhone 13 ची कमीत कमी 65,000 रुपयांना विक्री केली आहे.
iPhone 14 ची घोषणा
Apple ने बुधवारी Far Out इव्हेंट मध्ये नवीन iPhone 14 आणि iPhone 14 सीरीजची घोषणा केली. नवीन iPhone मॉडेल मागील मॉडेलपेक्षा अधिक महाग आहे. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे.
10 हजार रुपयांनी iPhone 13 स्वस्त
अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर विक्रीवर बंपर डिस्काऊंट सुरु आहे. त्यात iPhone 13 वर मोठी सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे iPhone 13 च्या लॉचिंग किंमतीपेक्षा सध्या हा फोन 15,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
अॅपल स्टोअरवर सवलत
iPhone 13 हा अॅपल स्टोअरवर 79,900 रुपयांना मिळत होता. त्यात आता 10 हजार रुपयांची थेट सवलत देण्यात आली आहे. तसेच स्टोअरमध्ये इतर अनेक सवलती ही मिळत आहेत. Apple च्या अधिकृत रिसेलर स्टोर वर iPhone 13 वरील अधिकच्या सवलती पाहता येतील.
iPhone 13, iPhone 13 mini च्या किंमती
iPhone 13 आता 69,900 रुपयांपासून उपलब्ध आहे. तर iPhone 13 मिनीची आता 64,900 रुपयांपासून विक्री होत आहे. या फोनच्या किंमती अशा आहेत.
iPhone 13 mini 128GB – Rs 64,900 iPhone 13 mini 256GB – Rs 74,900 iPhone 13 mini 512GB – Rs 94,900 iPhone 13 128GB – Rs 69,900 iPhone 13 256GB – Rs 79,900 iPhone 13 512GB – Rs 99,900
iPhone 12 च्या किंमतीतही कपात
Apple ने iPhone 12 च्या किंमतीतही कपात केली आहे. iPhone 12 आता 59,900 रुपयांपासून उपलब्ध आहे. iPhone 12 मिनीचे उत्पादन आता थांबवण्यात आले आहे.