कमी किंमत आणि मोठ्या बॅटरीची मागणी, आज रात्री 10.30 वाजता iPhone 13 चं लाँचिंग

नवीन आयफोन म्हणजेच आयफोन 13 सीरीजची प्रतीक्षा आज रात्री संपणार आहे. कंपनी आज आयफोन 13 सिरीजचे अनावरण करणार आहे.

कमी किंमत आणि मोठ्या बॅटरीची मागणी, आज रात्री 10.30 वाजता iPhone 13 चं लाँचिंग
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 4:45 PM

मुंबई : नवीन आयफोन म्हणजेच आयफोन 13 सीरीजची प्रतीक्षा आज रात्री संपणार आहे. कंपनी आज आयफोन 13 सिरीजचे अनावरण करणार आहे. अशा परिस्थितीत अनेकांना या सिरीजकडून मोठ्या आशा आहेत. Apple ने गेल्या काही काळापासून मोठ्या विक्रीच्या आकडेवारीला स्पर्श केला आहे. (iphone 13 series launching Tonight at 10.30 pm, check peoples demands like more battery and less price)

सर्वेक्षणानुसार, यूकेमध्ये राहणारे मोबाइल युजर्स पुढील 12 महिन्यांत 10 मिलियनहून अधिक आयफोन खरेदी करतील. यातील, नवीन आयफोन 13 मॉडेल उपलब्ध होताच सुमारे 40 लाख नवे मॉडेल्स खरेदी केले जातील. तथापि, मागील जनरेशनच्या तुलनेत नवीन आयफोनमध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत. यामध्ये फोनची बॅटरी सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे आणि या फोनची किंमत कमी ठेवली जाण्याची शक्यता आहे.

35 टक्के संभाव्य खरेदीदारांना त्यांच्या नवीन आयफोनवर दीर्घकाळ टिकणारी बॅटरी हवी आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. जर तुम्ही आधीच्या सर्व आयफोन्सची तुलना अँड्रॉइडशी केली तर कंपनीने त्यामध्ये कमी बॅटरी दिली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, अॅपलने अतिरिक्त बॅटरी बॅकअपसाठी आयफोन युजर्ससाठी MagSafe बॅटरी पॅक लाँच केला. पण तुम्हाला ते स्वतंत्रपणे विकत घ्यावे लागेल.

अशा परिस्थितीत, आता अॅपलला आयफोनवर बॅटरी बॅकअप वाढवावा लागेल जिथे अॅपल युजर्स बऱ्याच काळापासून त्याची मागणी करत आहेत. त्याचबरोबर बॅटरीनंतर काही लोकांची मागणी आहे की कंपनीने आपला आयफोन कमी किंमतीत लाँच करावा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लोकांना Apple ला जास्त पैसे द्यायचे नाहीत कारण कंपनी आधीच आयफोनसाठी जास्त किंमत आकारते.

आयफोन 13 चे संभाव्य खरेदीदार नवीन आयफोनमध्ये चांगला प्रोसेसर, कॅमेरा आणि स्क्रीन रिझोल्यूशनची अपेक्षा करत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. सुमारे 17 टक्के लोकांनी काही मॉडेल्सवर 1TB स्टोरेज पर्यायाची अपेक्षा केली आहे. चांगली बातमी अशी आहे की, आतापर्यंत आयफोन 13 बद्दल आलेल्या सर्व लीक्समध्ये हे सांगितले आहे. तथापि, बॉक्समध्ये चार्जर हवे असलेले सुमारे 27 टक्के युजर्स निराश होऊ शकतात.

त्याच वेळी, 42 टक्के वापरकर्ते जे एका आयफोनवरून दुसर्‍या आयफोनमध्ये शिफ्ट झाले आहेत ते म्हणतात की आयफोन एक मजबूत फोन आहे, म्हणून ते अजूनही या ब्रँडवर आहेत. त्याच वेळी, 38 टक्के युजर्स असे म्हणतात की, आम्ही अनेक वर्षांपासून आयफोन वापरत आहोत आणि आम्ही ते बदलू इच्छित नाही. त्याच वेळी, 54 टक्के लोकांनी सांगितले की ते आयफोनच्या हाय प्राईसमुळे हा फोन खरेदी करत नाहीत. 41 टक्के लोकांचा असा विश्वास होता की आयफोनच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे ते हा फोन खरेदी करणार नाहीत.

इतर बातम्या

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(iphone 13 series launching Tonight at 10.30 pm, check peoples demands like more battery and less price)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.