AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 14 Pro Max रॉयल एनफील्ड 350 पेक्षाही महाग… कुठल्या व्हेरिएंटची किती किंमत जाणून घ्या…

ॲप्पल आयफोन 14 प्रो आणि ॲप्पल आयफोन 14 प्रो मॅक्स हे दोन्ही फोन अनेक चांगल्या फीचर्स अन्‌ स्पेसिफिकेशन्ससह लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीने अखेर आपला ट्रॅडिशनल नॉच सोडून पिल शेप नॉच ग्राहकांसमोर सादर केला आहे. रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची एक्सशोरूम किंमत 1.70 लाख रुपये आहे, त्या पेक्षाही नवीन आयफोन महाग ठरत आहे.

iPhone 14 Pro Max रॉयल एनफील्ड 350 पेक्षाही महाग... कुठल्या व्हेरिएंटची किती किंमत जाणून घ्या...
| Updated on: Sep 08, 2022 | 4:28 PM
Share

मुंबईः ॲपलने (Apple) त्यांचे नवीन ॲपल आयफोन 14 प्रो आणि ॲपल आयफोन 14 प्रो मॅक्स (Apple iPhone 14 Pro Max) लॉन्च केले आहेत. आयफोन 14 प्रो मॅक्स हा एक महागडा स्मार्टफोन आहे असून त्याची किंमत रॉयल एनफिल्ड बुलेट 350 पेक्षा जास्त आहे. हे दोन्ही फोन अनेक चांगल्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह ग्राहकांसमोर सादर केले गेले आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जवळपास एकसारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत, परंतु दोन्हीमध्ये वेगवेगळ्या आकाराचे डिस्प्ले वापरण्यात आला आहे. कंपनीने आयफोन 14 (iPhone 14) आणि iPhone 14 Plus मध्ये A15 Bionic चिपसेट वापरला आहे, तर ॲपल आयफोन 14 प्रो आणि ॲपल आयफोन 14 प्रो मॅक्समध्ये A16 चिपसेट वापरला आहे. याशिवाय आयफोनच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये क्रॅश ॲक्सिडंट अलर्ट देण्यात आला आहे. याच्या माध्यमातून अपघातानंतर इमर्जन्सी नंबरवर लोकेशन आणि अलर्ट मिळेल. या फोनची किंमत 1.40 लाख रुपये आहे.

फोनचे व्हेरिएंट आणि त्याची किंमत

ॲपल आयफोन 14 प्रो (128जीबी) 1,29,900 ॲपल आयफोन 14 प्रो (256 जीबी) 1,39,900 ॲपल आयफोन 14 प्रो (512 जीबी) 1,59,900 ॲपल आयफोन 14 प्रो (1 टीबी) 1,79,900 ॲपल आयफोन 14 प्रो मॅक्स (128 जीबी) 1,39,900 ॲपल आयफोन 14 प्रो मॅक्स (256 जीबी) 1,49,900 ॲपल आयफोन 14 प्रो मॅक्स (512 जीबी) 1,69,900 ॲपल आयफोन 14 प्रो मॅक्स (1 टीबी) 1,89,900

ट्रिपल कॅमेरा सेटअप

आयफोन 14 प्रो सीरीजमध्ये कंपनीने ऑलवेज ऑन डिस्प्ले वापरला आहे. यामध्ये A16 बायोनिक चिपसेट वापरण्यात आला आहे. तसेच, यात बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, यात सॅटेलाइटशी एसओएस कनेक्टिव्हिटी आहे, ज्यामुळे युजर्स मोबाईल नेटवर्क नसतानाही त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना अलर्ट पाठवू शकतील.

आयफोन 14 प्रो सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Plus च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर iPhone 14 Pro मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे, iPhone 14 Pro Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.