iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

pple चा iPhone 13 लाँच झाल्यानंतर युजर्सचे लक्ष iPhone 14 कडे लागले आहे. नव्या आयफोनच्या फीचर्सबाबतही चर्चा सुरू झाली आहे. एका नवीन अहवालानुसार, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे आतापर्यंतचे सर्वात मोठा कॅमेरा अपग्रेड पॅक ऑफर करू शकतात.

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 9:53 PM

मुंबई : Apple चा iPhone 13 लाँच झाल्यानंतर युजर्सचे लक्ष iPhone 14 कडे लागले आहे. नव्या आयफोनच्या फीचर्सबाबतही चर्चा सुरू झाली आहे. एका नवीन अहवालानुसार, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे आतापर्यंतचे सर्वात मोठा कॅमेरा अपग्रेड पॅक ऑफर करू शकतात. इतकेच काय, आगामी आयफोनच्या अपग्रेडमध्ये सर्वाधिक रॅम देखील समाविष्ट होऊ शकतो. एक नवीन अहवाल सूचित करतो की Apple कंपनी 2022 च्या उत्तरार्धात मिनी मॉडेलशिवाय चार नवीन आयफोन मॉडेल लाँच करु शकते. अॅनालिस्ट जेफ पू (MacRumors) कडून हे दावे करण्यात आले आहेत. (iPhone 14 Pro will have 48MP camera and 8GB RAM, know more about it)

Apple चार मॉडेल लॉन्च करू शकते, ज्यात 6.1 इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 14, 6.7-इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 14 Max, 6.7 इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 14 Pro आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 14 Pro Max यांचा समावेश आहे.

हायटॉन्ग इंटरनॅशनल सिक्युरिटीज विश्लेषक पू यांच्या एका नोटमध्ये, Apple त्यांच्या प्रो मॉडेलवर कॅमेरे अपग्रेड करू शकते, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी वाइड-अँगल कॅमेरा समाविष्ट असल्याचे म्हटले आहे. असे म्हटले जात आहे की Apple त्यांच्या फोनच्या बॅक पॅनेलवर तीन कॅमेरे देईल. नवीन माहितीनुसार, केवळ प्रायमरी सेन्सर अपग्रेड केला जाईल.

आयफोन 14 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि टेलीफोटो सेन्सर्ससह येतील. तर त्यांचा प्रायमरी सेन्सर 48 मेगापिक्सेलमध्ये अपग्रेड केला जाईल.

iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स

Apple चे iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max 8GB RAM लाँच केले जाऊ शकतात, जे सध्याच्या iPhone 13 Pro मॉडेलवरील 6GB RAM पेक्षा चांगले आहे. विश्लेषक पू ने सांगितले की, की सर्व चार आयफोन मॉडेल्सना 120Hz प्रमोशन डिस्प्ले मिळू शकतो. किंवा iPhone 14 आणि सर्व-नवीन iPhone 14 Max अजूनही 60Hz डिस्प्ले मिळू शकतो. तर Pro मॉडेलला 120Hz डिस्प्ले सपोर्ट मिळू शकतो.

सुरुवातीच्या लीक्सनुसार Apple चा iPhone 14 Pro 1170×2532 पिक्सेल स्क्रीन रिझोल्यूशन आणि 120Hz प्रमोशन डिस्प्लेसह 6.1-इंच OLED डिस्प्लेसह येऊ शकतो. आयफोन 14 प्रो मॉडेलवर स्टोरेज मॉडेलमध्ये 128GB, 256GB, 512GB आणि 1TB हे पर्याय असू शकतात. Apple च्या चिपसेट सायकलनुसार, iPhone 14 सिरीज कंपनीच्या नवीन A16 Bionic चिपसेटद्वारे सुसज्ज असू शकते.

इतर बातम्या

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

Xiaomi Mi 11 Lite | धमाका… 2021 चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 8GB पर्यंत मिळेल RAM

(iPhone 14 Pro will have 48MP camera and 8GB RAM, know more about it)

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.