iPhone 14 सीरिज 7 सप्टेंबरला लाँच होणार! काय असतील नवीन फीचर्स?

7 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये अॅप्पल iPhone 14 सीरिजव्यतिरिक्त, स्मार्टवॉचसह इतर प्रोडक्टची घोषणा देखील करू शकतो. रिपोर्ट्सनुसार कंपनीने अपकमिंग आयफोनच्या डिझाइनमध्येही बदल केला आहे. iPhone 14 आणि iPhone 14 Pro बाबत या लेखातून अधिक माहिती घेणार आहोत.

iPhone 14 सीरिज 7 सप्टेंबरला लाँच होणार! काय असतील नवीन फीचर्स?
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 9:00 PM

अॅप्पलच्या अपकमिंग इव्हेंटसाठी जवळपास एक आठवडा शिल्लक आहे. या इव्हेंटकडे मोबाईल क्षेत्रातील कंपन्यांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. या इव्हेंटमध्ये अॅप्पल (Apple) iPhone 14 सीरीज लॉन्च करण्याची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अगदी खास ठरणार आहे. रिपोर्ट्सनुसार, आगामी आयफोन 14 (iPhone 14) सीरीज व्यतिरिक्त, कंपनी स्मार्टवॉचसह इतर अनेक प्रोडक्टची घोषणा करू शकते. काहीही झाले तरी सर्वांच्या नजरा आयफोन 14 सीरिजवर असतील, हे नक्की. कंपनी नवीन आयफोनचे चार मॉडेल आणणार असल्याचे मानले जात आहे. या लेखात iPhone 14 आणि iPhone 14 Pro च्या संभाव्य किंमती आणि फीचर्सची (features) माहिती घेणार आहोत.

आयफोन 14 आणि 14 प्रोचे डिझाइन

अॅप्पल 14 आणि प्रो मॉडेल्समध्ये मोठा फरक असण्याची शक्यता आहे. रिपोर्टस्‌नुसार, iPhone 14 च्या डिझाइनमध्ये फारसा बदल होणार नाही. आगामी iPhone 14 ब्रॉड-नॉच डिस्प्ले आणि ड्युअल कॅमेरा सेटअपसह येईल. युजर्सना त्यात iPhone 13 सारखा 6.1 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. त्याच बरोबर, iPhone 14 Pro च्या डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल पाहिले जाऊ शकतात. नवीन प्रो मॉडेल मोठ्या 6.7 इंचाच्या OLED डिस्प्लेसह लॉन्च केला जाऊ शकतो. यात अँड्रॉइड फोन्सप्रमाणे एलटीपीओ टेक्नीकचाही सपोर्ट मिळू शकतो. यात पंच-होल डिझाइन मिळू शकते.

iPhone 14 आणि 14 Pro फीचर्स

अॅप्पलचा नवीन A16 Bionic चिपसेट आगामी iPhone 14 Pro मध्ये समाविष्ट असेल. आयफोन 12 मॉडेल्सप्रमाणे आयफोन 14 मध्ये A15 बायोनिक चिपसेट सपोर्ट केला जाऊ शकतो. याशिवाय आगामी प्रो मॉडेलमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी, अॅस्ट्रोफोटोग्राफी मोड यासारखे अनेक चांगले फीचर्स उपलब्ध असतील. iPhone 14 Pro मध्ये 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. दुसरीकडे, iPhone 14 मध्ये फक्त 12 मेगापिक्सेलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

iPhone 14 आणि 14 Proची किंमत

आयफोन 14 मध्ये A15 बायोनिक चिपसेट सपोर्ट असेल, हे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. त्यामुळे, लीक्सनुसार, iPhone 14 ची किंमत iPhone 13 सारखीच असण्याची अपेक्षा आहे. iPhone 13 भारतात 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. लीक्सनुसार, आयफोन 14 सीरीज सध्याच्या आयफोन 13 सीरीजपेक्षा 10,000 रुपये महाग असेल. नवीन A16 बायोनिक चिपसेट iPhone 14 Pro मध्ये सपोर्ट केला जाऊ शकतो. इंडिया टुडेच्या मते, त्यामुळे त्याची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होऊ शकते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.