AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मार्टफोनची 6 हजारपेक्षा कमी किंमत, फिचर iPhone सारखे, आज सेल

Smart phone 8 HD and iPhone | आयफोन घेण्याचा विचार आपण करतो, परंतु बजेटमध्ये आयफोन मिळत नाही. परंतु आयफोनसारखे फिचर देणारा फोन अगदी कमी किंमतीत आला आहे. यामुळे स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी नवीन चांगला पर्याय मिळाला आहे.

स्मार्टफोनची 6 हजारपेक्षा कमी किंमत, फिचर iPhone सारखे, आज सेल
infinix smart 8 hd
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 10:20 AM

नवी दिल्ली, | 9 डिसेंबर 2023 : आयफोन घेण्याचा विचार अनेक जण करतात. परंतु बजेटमध्ये नसल्यामुळे आयफोन घेतला जात नाही. आता आयफोन नाहीतर आयफोन सारखे फिचर असणारा फोन बाजारात आला आहे. हा फोन बजेटमध्ये म्हणजेच अगदी सहा हजारापर्यंतच आहे. यामुळे आयफोनचे फिचर बजेट फोनमध्ये वापरता येणार आहे. Infinix कंपनीने हा फोन लॉन्च केला आहे. Infinix Smart 8 HD मध्ये अनेक फिचर आहेत. त्यात 90Hz रिफ्रेश रेट वाली स्क्रीन आहे. स्टँडर्ड प्रोसेसर, मॅजिक रिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर या सारखे फिचर्स यामध्ये दिले आहे. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फोनचा पहिला सेल १३ डिसेंबर दुपारी १२ वाजता होत आहे. फ्लिपकार्टवर ही सेल सुरु होत आहे.

काय आहेत फिचर

स्मार्टफोन सिंगल कॉन्फिग्रेशन 3GB RAM + 64GB स्टोरेज आहे. यामध्ये पिल शेप्ड मॅजिक रिंगचे फिचर दिले आहे. यामुळे एनिमेशन आणि नोटिफिकेशन शो होतो. या फोनमध्ये बॅटरी जबरदस्त आहे. 5000mAh ची बॅटरी आहे. या फोनची किंमत सहा हजाराच्या आत आहे. हा स्मार्टफोन केवळ 5,669 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Infinix Smart 8 HD फोन 10 टक्के डिस्काउंटवर Axis Bank कार्डवर उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

अ‍ॅपलसारखे हे फिचर्स

अ‍ॅपलमध्ये असणारे डायनॉमिक आयलँडसारखे नोटिफिकेशनयामध्ये दिले आहे. यामध्ये बॅकग्राउंड कॉल, लो बॅटरी रिमाइंडर आणि इतर नोटीफीकेशन्स मिळणार आहे. यामध्ये octa-core Unisoc T606 प्रोसेसर दिले आहे. 3GB RAM आणि 64GB स्टोरेज असणारा हा फोन मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 2TB पर्यंत स्टोरेज करता येणार आहे. फोनमध्ये डुअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये मेन लेन्स 13MP तर फ्रंट 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. डुअल सिम सपोर्ट असणारा Infinix Smart 8 HD स्मार्टफोन Android 13 (Go Edition) वर बेस्ड XOS 13 वर काम करतो. 6.6-inch चा HD+ डिस्प्ले यामध्ये दिले आहे. Infinix Smart 7 HD कंपनीने या वर्षी एप्रिल महिन्यात लॉन्च केला होता. त्याची किंमत 5,999 रुपये होती. 2GB RAM + 64GB स्टोरेज त्यात होते. त्याचे पुढचे व्हर्जन कमी किंमतीत आले आहे.

भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.