कोरोनावरील उपचारांसाठी केंद्र सरकारकडून तरुणांना 4000 रुपयांची मदत, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियाने जग खूप बदललं आहे. माहिती मिळवण्यापासून ते दूरवर असलेल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाची मदत होते. मात्र सोशल मीडियाच्या या युगात धोकेदेखील कमी नाहीत.

कोरोनावरील उपचारांसाठी केंद्र सरकारकडून तरुणांना 4000 रुपयांची मदत, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 9:45 PM

मुंबई : सोशल मीडियाने जग खूप बदललं आहे. माहिती मिळवण्यापासून ते दूरवर असलेल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाची मदत होते. मात्र सोशल मीडियाच्या या युगात धोकेदेखील कमी नाहीत. हा धोका फेक न्यूजचा आहे, जो आपल्यासमोर अशा प्रकारे येतो, ज्यावर आपण सहसा विश्वास ठेवतो. पण जेव्हा त्या बातमीचे सत्य समोर येते, तेव्हा आपल्याला कपाळावर हात मारुन घ्यावा लागतो. (Is Modi Govt giving Rs 4000 to youth for corona treatment, check PIB fact check report)

कोरोना संक्रमणाच्या काळातही अशाच बातम्या (फेक न्यूज) व्हायरल झाल्या आणि त्या अजूनही सूरुच आहेत. अलीकडेच एक बातमी पसरली की, कोरोनावरील उपचारांसाठी एका शासकीय योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत करत आहे.

वास्तविक, सोशल मीडियावर फिरणारा स्क्रीनशॉट हा व्हॉट्सअॅप चॅटमधील मेसेज आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. खाली लिहिले आहे की, पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनेसाठी नोंदणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत सर्व तरुणांना मदत म्हणून 4000 रुपये मिळतील. नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि आपला फॉर्म भरा.

सत्य काय?

पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने या व्हायरल मेसेजची चौकशी केली आणि सत्य बाहेर आणले. पीआयबीच्या मते हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही. अशा बनावट वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नका

डिजिटलच्या या युगाचे अनेक फायदे आहेत, परंतु जर तुम्ही सावध नसाल तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल. असे नुकसान ज्यात तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते. तुमचा बँक खाते क्रमांक आणि संबंधित माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागू शकते. ते तुमची माहिती चुकीच्या पद्धतीने वापरू शकतात. म्हणूनच, बँकांपासून सर्व सरकारी संस्थांपर्यंत, लोकांना कोणत्याही अज्ञात दुव्यावर (लिंकवर) क्लिक न करण्याचा सल्ला दिला जातो.

तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ, फोटोवर शंका असल्यास तुम्ही +91 8799711259 या क्रमांकावर WhatsApp करू शकता किंवा socialmedia@pib.gov.in वर ईमेल करू शकता. या व्यतिरिक्त, आपण ट्विटर @PIBFactCheck किंवा /PIBFactCheck इन्स्टाग्राम किंवा /PIBFactCheck Facebook वर देखील संपर्क साधू शकता.

इतर बातम्या

उत्तर प्रदेशात 403 ऐवजी 100 जागा लढवणार, 24 तासात शिवसेना बॅकफूटवर; महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या सेना नेत्यांमध्ये संभ्रम?

गोवा, उत्तर प्रदेशात मविआचा प्रयोग; गोव्यात 20 तर उत्तर प्रदेशात 100 जागा लढवणार; संजय राऊत यांची घोषणा

VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन

(Is Modi Govt giving Rs 4000 to youth for corona treatment, check PIB fact check report)

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.