15 वर्षापूर्वीचं ट्विट विक्रीला; 2 कोटी रुपये किंमत; वाचा नेमकं प्रकरण काय?
ट्विटरचे सीईओ अब्जाधीश जॅक डोरसी हे त्यांचं 15 वर्षापूर्वीचं ट्विट विकणार आहेत. (Jack Dorsey puts his 1st tweet on sale, bid reaches Rs 2 cr)
नवी दिल्ली: ट्विटरचे सीईओ अब्जाधीश जॅक डोरसी हे त्यांचं 15 वर्षापूर्वीचं ट्विट विकणार आहेत. त्यांचं हे सर्वात पहिलं ट्विट असून विशेष म्हणजे या ट्विटला 2 कोटी रुपयांची बोली लागली आहे. 6 मार्च 2006 रोजी म्हणजे बरोबर 15 वर्षांपूर्वी त्यांनी हे ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी, ‘जस्ट सेटिंग अप माय ट्विटर’, असं लिहिलं होतं. एवढ्या मोठ्या किंमतीला विकलं जाणारं जगातील हे पहिलंच ट्विट असल्याचं सांगण्यात येत आहे. (Jack Dorsey puts his 1st tweet on sale, bid reaches Rs 2 cr)
15 वर्षानंतर डोरसी यांनी त्यांचं ट्विट क्रिप्टोकरन्सी म्हणून विकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर डोरसी यांच्या ट्विटला बोलीही लागली होती. 2,67,000 डॉलर म्हणजे सुमारे दोन कोटी रुपयांची बोली त्यांच्या एका ट्विटसाठी लागली आहे. डोरसे यांनी एनएफटी (नॉन-फंजिबल टोकन)साठी एका बिडिंग लिंकसोबत व्हॅल्यूएबल्स नावाच्या एका प्लॅटफॉर्मवरून ट्विट केलं होतं. एनएफटी अथेरियम ब्लॉकचेनवरील एक डिजिटल टोकन आहे.
हे ट्विट इतके खास का?
तुम्ही विकत घेत असलेलं ते ट्विट एक डिजीटल सर्टिफिकेट आहे. या ट्विटला मॅन्युफॅक्चररने साईन आणि इन्स्टॉल केलं आहे, म्हणूनच हे ट्विट अनोखं असल्याचं व्हॅल्युएब्ल्सने म्हटलं आहे. आश्चर्य म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून हे ट्विट इंटरनेटवर फुकटात उपलब्ध आहे. तरीही या ट्विटचे मालकी हक्क घेण्यासाठी दोन कोटीची बोली लागली आहे.
NFTद्वारे डिजीटल आयटमची विक्री
एनएफटीद्वारे डिजीटल आयटम्सची खरेदी-विक्री करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच ब्लॉकचेनचा वापर करणाऱ्या लोकांचं रेकॉर्डही ठेवलं जातं. प्रसिद्ध आर्टिस्ट ग्रीम्स यांनी नुकतेच 60 लाख डॉलरमध्ये एनएफटी आयटम विकले आहेत.
ऐतिहासिक कमाई
लेब्रोन जेम्सच्या एका एनएफटीने लेकर्ससाठी 2,00,000 डॉलर पेक्षा अधिक म्हणजे दोन कोटीपेक्षा अधिक कमाई केली होती. ही ऐतिहासिक कमाई होती. लिओन के बँड किंग्स एनएफटीच्या रुपात नवीन अल्बम काढणार आहे, असं एनपीआरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एनएफटी ब्लॉकचेनवर करन्सीच्या एका युनिटवर रेफर करत असतो. बिटकॉईनसारखी क्रिप्टो करन्सीची जशी खरेदी-विक्री होते तशीच याचीही खरेदी विक्री होते. (Jack Dorsey puts his 1st tweet on sale, bid reaches Rs 2 cr)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/WvTVoUSAyo
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2021
संबंधित बातम्या:
भारतीय महिला कोणत्या विषयांवर सर्वाधिक चर्चा करतात? ट्विटरने केले उघड
WhatsApp वरील फोटोज आपोआप डिलीट करणारं नवं फीचर येतंय, जाणून घ्या कसं असेल फीचर
(Jack Dorsey puts his 1st tweet on sale, bid reaches Rs 2 cr)