JioPhone Next : सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही प्रामुख्याने एक टेलिकॉम कंपनी आहे जी काही वर्षांपूर्वीच या क्षेत्रात उतरली आहे. अगदी कमी वेळात जिओ देशातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी बनली आहे.

JioPhone Next : सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 10:34 PM

मुंबई : रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेक जायंट गुगलसोबत भागीदारी करून खास भारतीय ग्राहकांसाठी तयार केलेला ‘जिओफोन नेक्स्ट’ (JioPhone Next) हा स्मार्टफोन उद्या (10 सप्टेंबर – शुक्रवार) लॉन्च होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की, जिओफोन नेक्स्ट हा केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल. (Jio Phone Next will launch in India on 10 september, know price and features)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही प्रामुख्याने एक टेलिकॉम कंपनी आहे जी काही वर्षांपूर्वीच या क्षेत्रात उतरली आहे. अगदी कमी वेळात जिओ देशातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी बनली आहे. 2017 मध्ये, जिओ फोन उत्पादनाच्या क्षेत्रात उतरली आणि गेल्या साडेतीन वर्षात जिओने कमी बजेट आणि चांगल्या फीचर्सचे मोबाईल फोन लाँच केले. जिओचा पुढचा स्मार्टफोन, जिओफोन नेक्स्ट हासुद्धा असाच एक जबरदस्त असणार फोन आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या वैशिष्ट्यांविषयी…

JioPhone Next मधील 8 महत्त्वाचे फीचर्स

  • JioPhone Next अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनवर काम करतो, हे व्हर्जन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे विशेषतः भारतीय बाजारासाठी विकसित केले आहे.
  • JioPhone नेक्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतो ज्यामध्ये व्हॉईस असिस्टंट, भाषा अनुवाद, स्क्रीन टेक्स्टचा स्वयंचलित रीड-अलाऊड आणि यात ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आहे.
  • JioPhone नेक्स्ट 3,499 रुपयांच्या अंदाजे किंमतीसह लाँच केला शकतो. पण रिलायन्स जिओ या फोनची किंमत कमी करण्यासाठी अधिक ऑफर देऊ शकते.
  • जिओफोन नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरसह लॉन्च होण्याची शक्यता आहे जे 4 जी नेटवर्कला सपोर्ट करते.
  • रिलायन्स जिओ खरेदीदाराला 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंट असे दोन पर्याय मिळतील, अशी अपेक्षा आहे. इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये, जिओ 16GB व्हेरिएंट आणि 32GB व्हेरिएंट लॉन्च करू शकते.
  • डिव्हाइसला HD रिझोल्यूशनसह 5.5 इंच डिस्प्ले मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • नवीन जिओफोन नेक्स्ट ब्लू व्हेरिएंटसह विविध रंगांमध्ये लॉन्च केला जाईल.

स्मार्टफोन फास्ट, उच्च दर्जाच्या कॅमेरऱ्यासह सज्ज आहे, ज्याद्वारे रात्री आणि कमी प्रकाशात क्लियर फोटो काढता येतील. फोटो शेअरिंग अॅप स्नॅपचॅटची मूळ कंपनी असलेल्या स्नॅपसोबत गुगलनेही भागीदारी केली आहे, जेणेकरुन स्नॅपचॅट लेन्स थेट फोन कॅमेराला देता येईल.

Reliance Jio परवडणारा आणि गुगल बॅक्ड स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) लवकरच लॉन्च होणार आहे. हा फोन 10 सप्टेंबर रोजी रिलीजसाठी सेट आहे, जिओफोन नेक्स्ट हा तुम्ही बाजारात पाहात असलेल्या बहुतेक सर्वच स्मार्टफोनपेक्षा अधिक परवडणारा स्मार्टफोन असणार आहे. परंतु, जिओफोन नेक्स्टच्या नियमित खरेदी व्यतिरिक्त, कंपनी लोकांना विविध पर्याय देऊ इच्छिते जे विस्तृत सेल्स स्ट्रक्चरप्रमाणे आहे. त्यापैकी एक म्हणजे जिओ फोन नेक्स्ट, जो 500 रुपयांत खरेदी करता येईल, परंतु इथे एक अडचण आहे.

जियोफोन नेक्स्ट आणि सेल

रिपोर्टनुसार, कंपनी दोन जिओफोन नेक्स्ट मॉडेल आणणार आहे. एक बेसिक जिओफोन नेक्स्ट असेल ज्याची किंमत 5000 रुपये असेल, तर दुसरीकडे जिओफोन नेक्स्ट अॅडव्हान्स असेल ज्याची किंमत 7000 रुपये असेल. ग्राहकाला कोणताही फोन खरेदी करायचा असेल तर त्यांना संपूर्ण किंमत मोजावी लागणार नाही. ते संपूर्ण रकमेच्या केवळ 10 टक्के म्हणजेच 500 रुपये देऊन बेसिक मॉडेल आणि अॅडव्हान्स मॉडेल खरेदी करू शकतात. यानंतर, त्यांना उरलेले पैसे बँक आणि कर्ज देणाऱ्या भागीदाराला द्यावे लागतील. येथे हे स्पष्ट आहे की, तुम्हाला हा फोन हप्त्यांमध्ये घ्यावा लागेल.

रिलायन्स जिओने एनबीएफसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे. अशा परिस्थितीत जर ग्राहकाने फोन खरेदी केला तर त्याला थोडी जास्त रक्कम मोजावी लागेल. म्हणजेच 5000 रुपये किंमतीचा फोन ईएमआय लागू केल्यानंतर अधिक किमतीचा असेल. मात्र, ही रक्कम किती असेल आणि फोनची मूळ किंमत किती असेल, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.

जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाईल जी अँड्रॉइड 11 वर आधारित असेल. अँड्रॉइड गोच्या मदतीने ग्राहक अँड्रॉइड फोनच्या मूलभूत अनुभवाचा आनंद घेऊ शकतील. येथे त्यांना गुगलच्या सर्व्हिसचाही अॅक्सेस मिळेल, ज्याद्वारे सॉफ्टवेअर अपडेट, गुगल असिस्टंट आणि गुगल प्ले स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी मिळेल. युजर्स या फोनमध्ये सर्व लोकप्रिय गेम डाउनलोड करण्यास सक्षम असतील.

इतर बातम्या

रे-बॅनच्या सहकार्याने फेसबुक स्मार्ट ग्लासेस करणार लाँच, जाणून घ्या काय असेल खासियत

 त्वरा करा! आयफोन 13 लाँच होण्यापूर्वी, आयफोन 12 वर हजारो रुपयांची सूट, काही तासांसाठीच आहे ऑफर

अवघ्या 6,999 रुपयात दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात

(Jio Phone Next will launch in India on 10 september, know price and features)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.