AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

second hand car: कोणती कार घेताना काय कराल? या चुका टाळाल तर फायद्यात राहाल

सेकंड हँड कारची खरेदी करीत असताना सामान्य माणूस केवळ बाहेरील रंगरंगोटीवरच अधिक भर देत असतो. परंतु या लेखात आम्ही तुम्हाला सेकंड हँड कारची खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याबाबत माहिती देणार आहोत.

second hand car:  कोणती कार घेताना काय कराल? या चुका टाळाल तर फायद्यात राहाल
प्रातनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 11:31 AM

मुख्य बातमीनवीन कार घेणे सर्वांनाच परवडेल असे नाही, त्यामुळे अनेक जण सेकंड हँड कार (second hand car) खरेदीला प्राधान्य देत असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भारतात सेकंड हँड वाहनांचा बाजार चांगलाच तेजीत आलेला दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांच्या कोरोना (Corona) काळात ज्या वेळी सार्वजनिक वाहतूक सेवा बंद होती अशा वेळी खासगी वाहनांना मागणी वाढली. कोरोना काळात नवीन कारसह सेकंड हँड कारच्या विक्रीमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सुरक्षेच्या (security) दृष्टीने अनेकांनी स्वत:ची वाहने खरेदी केलीत त्यामुळे हा बाजारदेखील सध्या तेजीत आलेला आहे. आपण बहुतेकदा कार खरेदी करताना काही चुका करतो, नंतर ती लक्षात आल्यावर वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे सेकंड हँड कारची खरेदी करताना कुठल्या चुका टाळाव्यात व कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हे, या लेखातून सांगणार आहोत.

1) कागदपत्रांची तपासणी करावी

सेकंड हँड कारची खरेदी करीत असताना पहिल्यादा तिच्या कागदपत्रांची तपासणी करणे आवश्‍यक आहे. गाडीच्या विम्याची कागदपत्रे, आधी काही कर्ज शिल्लक आहे का, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आदी कागदपत्रांची चांगली तपासणी करुनच कार खरेदी करावी. या सोबतच कागदपत्रांवर लिहलेला इंजीन क्रमांक आणि चेसिस नंबरही अवश्‍य तपासून घ्यावा. विम्याच्या कागदावरुन आधीच्या अपघातासंबंधित माहिती मिळत असते.

2) आरसी आपल्या नावावर असावे

सेकंड हँड कार खरेदी केल्यानंतर पहिल्यांदा आरसी बूक आपल्या नावावर करुन घ्यावे. यासाठी आरटीओ कार्यालयातून मिळत असलेला अर्ज 29 आणि अर्ज 30 अवश्‍य भरुन घ्यावा. हा अर्ज आधीचा कार मालक व आताचा कार मालक अशा दोघांकडून भरला जात असतो. कागदपत्र आरटीओत जमा केल्यानंतर 15 ते 18 दिवसांनी त्याची पावती मिळते व आरसी बूक साधारणत: 40 ते 45 दिवसांत नवीन मालकाच्या नावे होते.

हे सुद्धा वाचा

3) फ्यूअलची नोंद पहावी

बरेच लोक आपल्या कारमध्ये फ्यूअल म्हणून सीएनजी अपग्रेड करीत असतात. परंतु याची नोंद प्रत्यक्षात आरसी बूकवर नसते. त्यामुळे गाडी खरेदी करीत असताना हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या फ्यूअलवर गाडी चालते त्याच फ्यूअलची नोंद आरसी बूकवर असायला हवी.

4) कंडीशन पहावी

कारची खरेदी करीत असताना गाडीची कंडीशन पहावी, गाडीची टेस्ट ड्राईव्ह अवश्‍य घ्यावी, सोबत गाडीचे इंजीन, कार ब्रेक, लाईटींग, वायरिंग, कूलिंग, सस्पेंशन आदींचीही पडताळणी करावी. ओळखीतल्या एखादया कारागिराला वाहन दाखवा, ओबडधोबड रस्त्यांवर कार विविध स्पीडमध्ये चालवून तिचे सस्पेंशन चेक करा, कारचे बोनेट उघडून इंजीनची तपासणी करावी, शिवाय कारचा काही मोठा अपघात झालाय काय? याची माहिती घ्यावी, कुठलीही कार खरेदी करीत असताना सर्वात आधी तिची संबंधित कंपनीच्या शोरुममध्ये जाउन हिस्ट्री तपासावी, कार आतापर्यंत नियमित सर्व्हिसिंग झालीय की नाही? याची माहिती घ्यावी.

ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.