AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KTM ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच लाँच होणार, पाहा किंमत

KTM लवकरच नवीन स्पोर्ट्स बाईक RC125 लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक कंपनीची सर्वात स्वस्त बाईक असेल, असं कंपनीने म्हटलं आहे.

KTM ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच लाँच होणार, पाहा किंमत
Follow us
| Updated on: Jun 14, 2019 | 6:44 PM

मुंबई : KTM लवकरच नवीन स्पोर्ट्स बाईक RC125 लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक कंपनीची सर्वात स्वस्त बाईक असेल, असं कंपनीने म्हटलं आहे. 125 Duke चा फेअर्ड व्हर्जन आहे. देशभरात KTM च्या नव्या बाईकसाठी बुकिंग सुरु झाली आहे. बुकिंग किंमत 5 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. KTM च्या या नव्या बाईकचा टीजर व्हिडीओही समोर आला आहे.

टीजर व्हिडीओ पाहून स्पष्ट होते की, KTM ची ही नवीन बाईक ऑरेंज आणि ब्लॅक रंगात आहे. या बाईकचे अलॉय व्हीलही ऑरेंज रंगात आहेत. याशिवाय बाईक अजून एका रंगात उपलब्ध असेल. भारतात येणारा RC125 मॉडल इंटरनॅशनल मॉडलसारखा असेल, पण फीचरमध्ये काहीतरी बदल मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टेस्टिंग दरम्यान पाहिले असता, RC 125 मध्ये अंडरबेली एग्जॉस्ट दिला आहे. इंटरनॅशनल मॉडलमध्ये साईट माऊंटेड एग्जॉस्ट आहे. याशिवाय बाईकच्या इंडियन मॉडलमध्ये रिअर टायर हगर आणि साडी गार्ड दिला आहे.

इंजिन आणि फीचर्स

RC 125 मध्ये इंजिनसह अधिक फीचर 125 Duke मधील दिले जातील अशी अपेक्षा आहे. 125 Duke मध्ये 124.7 cc, सिंगल-सिलिंडर, DOHC, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे 14.5hp चे पॉवर आणि 12Nm टॉर्क जनरेट करते. आरसी 125 चे सस्पेंशन सेटअप आणि त्याची ब्रेकिंगही 125 ड्यूक प्रमाणे असतील. दरम्यान, नवीन बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस मिळणार की सिंगल चॅनल एबीएस मिळणार हे मात्र अजून स्पष्ट नाहीये. कारण 125 ड्यूक मध्ये सिंगल चॅनल एबीएस आहे.

किंमत

KTM RC 125 च्या किमतीची माहिती समोर आली आहे. या नव्या बाईकची किंमत अंदाजे 1.5 लाख रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. ही किंमत 125 ड्युकपेक्षा 20 हजार रुपयांनी अधिक आहे. ही KTM मधील सर्वात स्वस्त स्पोर्ट बाईक म्हणून भारतीय बाजारात उपलब्ध असेल. किंमतीनुसार केटीएमची नवीन बाईक YZF-R15 V3.0 आणि Bajaj Pulsar RS 200 ABS सारख्या बाईकला टक्कर देईल.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.