Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती आणि मुलीच्या फोटोपासून ते प्रभूकुंजच्या पत्त्यांपर्यंत, लतादीदींच्या निधनानंतर नेटिझन्स गुगलवर काय-काय सर्च करतायत?

What users searching about Lata Mangeshkar on Google : महान गायिका भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. देशातील त्यांचे अनेक चाहते गुगलवर सातत्याने त्याच्या घराबद्दलची माहिती ते निधनाचे कारणं इत्यादी गोष्टी सर्च करत आहेत. गेल्या काही तासात गुगल यूजर्स (Google users) ने त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी जाणून घेत आहेत. चला तर मग जाणून घेऊया लतादीदींबद्दल...

पती आणि मुलीच्या फोटोपासून ते प्रभूकुंजच्या पत्त्यांपर्यंत, लतादीदींच्या निधनानंतर नेटिझन्स गुगलवर काय-काय सर्च करतायत?
Lata mangeshkar
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 5:26 PM

मुंबई : स्वरसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले. मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) मल्‍टीपल ऑर्गन फेल्‍यूरशी (Multiple organ failure) लढताना त्यांनी या जगाचा निरोप घेतला. लतादीदी यांची वयाच्या 92 व्या वर्षी प्राण ज्योत मालवली. देशभर यामुळे शोक व्यक्त केला जात आहे परंतु देशभरातील त्यांचे चाहते सातत्याने गुगल वर त्यांच्या घराबद्दल ते त्यांच्या निधनामागील कारणं इत्यादी गोष्टी शोधत आहेत. गेल्या काही तासांमध्ये गुगल युजर्सने (google users) त्यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी गुगलवर सर्च केल्या आहेत. त्यांच्या या सर्च करण्याचा लिस्ट (search list) मध्ये सर्वात जास्त शोधला जाणारा कीवर्ड म्हणजे त्यांचे वय.

‘प्रभूकुंज’: लता मंगेशकर यांचे घर

गुगल युजर्स ‘प्रभूकुंज’बद्दल (Prabhukunj) सर्च करत आहेत. सर्चिंग मध्ये सर्वात पुढे मुंबई आणि दुसऱ्या क्रमांकावर पुण्याचे लोक आहेत. लता मंगेशकर यांचे पार्थिव शरीर त्यांच्या पेडर रोड स्थित निवासस्थान ‘प्रभुकुंज’ येथे आणले गेले आहे. रविवारी संध्याकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

तारुण्यातील फोटो

गानकोकीळा आपल्या तरुणपणी दिसायला कश्या होत्या, सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या टॉपिकमध्ये याच गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मुंबई नव्हे तर उत्तर प्रदेशातील लोक लता मंगेशकर तरुण वयामध्ये कशा दिसायच्या याबद्दल सर्च करत आहेत.

RIP लिहलेला फोटो

लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर स्टेटस आणि सोशल मीडियाच्या पोस्टसाठी युजर्स मोठ्या प्रमाणावर लता मंगेशकर यांचे फोटो शोधत आहेत आणि या फोटोवर RIP लिहिलेले फोटो जास्तीत जास्त सर्च मध्ये पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे सर्च करणारे सर्वात पहिले राज्य छत्तीसगड आणि दुसरे झारखंड आहे.

घराचा पत्ता

गुगल ट्रेंडमध्ये एक गोष्ट समोर आली आहे की, लोक फक्त त्यांच्या घराबद्दलच नाही तर त्यांच्या घराच्या पत्त्याबद्दल सुद्धा सर्च करत आहेत. मुंबईतील लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घराचा पत्ता शोधत आहेत ही बाब सातत्याने सर्च इंजिन द्वारे मिळाली आहे.

मुलगी आणि पतीचा फोटो

स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांनी लग्न केले नव्हते हे माहिती असूनही गुगल युजर्स त्यांच्या पतीबद्दल व मुली बद्दलची माहिती शोधत आहेत. त्यांनी लग्न का नाही केले? वर्ष 2011 मध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने टीओआईला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना विचारले गेले होते की, तुम्हाला लग्न करावसं वाटलं नाही का? त्यावर उत्तर देताना त्यांनी ‘नाही’ असं सांगितलं होतं.

“सौगंध मुझे इस मिट्ठी की” हे गाणे

गूगल ट्रेंड नुसार रिपोर्ट सांगत आहे की, युजर्स लता मंगेशकरद्वारा गायले गेलेले शेवटचे गाणे ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ हे गाणं सर्च करत आहेत. हे गाणं त्यांनी 30 मार्च, 2019 रोजी रिकॉर्ड केले होते, जे देशातील जवानांना समर्पित होते. रिकॉर्डिंगआधी त्यांनी सांगितले होते की, मी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे भाषण ऐकत होती. त्यांनी एक कवितेच्या काही ओळी म्हटल्या होत्या. जे मला वास्तविक प्रत्येक भारतीयांच्या मनांतील बोल वाटत होते आणि त्या ओळींनी माझ्या हृदयाला स्पर्श केला होता.

इतर बातम्या

Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा

लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार

वर्ल्डकप विजेत्या संघासाठी BCCI कडे नव्हते पैसे, तेव्हा लतादीदींनी दिलेला मदतीचा हात

जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
सप्तश्रृंगी गडावर भविकांची अलोट गर्दी, एकमेकांना ढकलाढकली; घडलं काय?
सप्तश्रृंगी गडावर भविकांची अलोट गर्दी, एकमेकांना ढकलाढकली; घडलं काय?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.