Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lava Agni 5G भारतात लाँच, मजबूत बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरसह जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Lava Agni 5G ची किंमत 19999 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. मात्र कंपनीतर्फे सध्या स्पेशल डिस्काउंट दिले जाणार आहे, यानंतर याची किंमत 17999 रुपये होईल. हा स्मार्टफोन लावाची अधिकृत वेबसाइटवरुन प्री बुक करता येईल.

Lava Agni 5G भारतात लाँच, मजबूत बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरसह जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Lava Agni 5G भारतात लाँच
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 4:12 PM

नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने आज (मंगळवार) 5G कनेक्टिव्हिटीसह आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईल फोनचे नाव आहे Lava Agni 5G. उत्कृष्ट वैशिष्ट्ये असणारा हा फोन बाजारात दाखल झाला आहे. मुख्य वैशिष्ट्यांबाबत बोलायचे तर यात 5G टेक्नेलॉजी देण्यात आली आहे. तसेच यात मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसरही देण्यात आले आहे. शिवाय यामध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा दिला आहे. सुंदर डिझाईन आणि रेक्टँगुलर कॅमरा सेटअप दिले आहे.

Lava Agni 5G ची किंमत आणि उपलब्धता

Lava Agni 5G ची किंमत 19999 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. मात्र कंपनीतर्फे सध्या स्पेशल डिस्काउंट दिले जाणार आहे, यानंतर याची किंमत 17999 रुपये होईल. हा स्मार्टफोन लावाची अधिकृत वेबसाइटवरुन प्री बुक करता येईल. हा स्मार्टफोन विक्रीसाठी केव्हा उपलब्ध होईल, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. हा फेयरी ब्लू रंगामध्ये येतो.

Lava Agni 5G ची स्पेसिफिकेशन

Lava Agni 5G मध्ये 2.5D वक्र ग्लाससह 6.78-इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 1080×2460 रिझोल्युशनसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईलमध्ये MediaTek Dimension 810 चिपसेट दिला आहे. तसेच, यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन Android 11 वर बॉक्सच्या बाहेर काम करतो.

Lava Agni 5G चा कॅमेरा सेटअप

Lava Agni 5G च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, बॅक पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे. यात 5 मेगापिक्सल्सचा दुय्यम कॅमेरा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. यासोबतच इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत तसेच फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो स्क्रीन फ्लॅश फीचर्ससह येतो. यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो क्लिक करण्यात मदत होईल.

लावा अग्नी 5G बॅटरी

Lava Agni 5G च्या बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000 mAh Li-Polymer बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जिंग क्षमतेसह येते. तसेच या स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. यात OTG सपोर्ट, ब्लूटूथ v 5.1 आणि टाइप सी यूएसबी कनेक्टिव्हिटी ही वैशिष्ट्ये आहेत. (Lava Agni 5G Launched In India With Strong Battery And MediaTek Processor, know Price And Features)

इतर बातम्या

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Motorola चा बजेट स्मार्टफोन बाजारात, किंमत…

POCO M4 Pro 5G आज लाँच होणार, जाणून घ्या नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये काय असेल खास

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.