Lava चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Lava ने अलीकडेच ऑनलाइन अपलोडद्वारे भारतात आपला पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची पुष्टी केली आहे. Lava Agni 5G नावाचा स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लाँच होईल.
मुंबई : Lava ने अलीकडेच ऑनलाइन अपलोडद्वारे भारतात आपला पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची पुष्टी केली आहे. Lava Agni 5G नावाचा स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लाँच होईल. त्याबद्दलचे काही तपशील कंपनीने आधीच शेअर केले आहेत. लॉन्चचे तपशील शेअर करताना, कंपनीने YouTube वर एक व्हिडीओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की, कंपनी अग्नी 5G हा स्मार्टफोन 9 नोव्हेंबर रोजी लाँच करेल. (Lava Agni 5G smartphon to launched in India on november 9)
व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, लॉन्च इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरू होईल. स्मार्टफोनबद्दल, त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि डिझाइनबद्दल बरीच माहिती ऑनलाइन शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन लावा फोन सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल कटआउटसह 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह बाजारात दाखल होईल. हा फोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 810 5G चिपसेटवर काम करेल.
यामध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल आणि कनेक्टिव्हिटीसाठी USB टाइप-सी पोर्ट असेल. तसेच यात 3.5mm हेडफोन जॅक आणि दोन्ही बाजूंना स्पीकर ग्रिल असेल.
Lava Agni ची खासियत
Lava Agni 5G Android 11 सह लाँच होईल, अशी आपण अपेक्षा करू शकतो. फोनच्या लिस्टमध्ये असेही सुचवण्यात आले आहे की यात ‘गेमिंग मोड’ असेल. मागील बाजूस, ट्रिपल लेन्स कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 64 मेगापिक्सेला प्रायमरी कॅमेरा असेल सोबत एलईडी फ्लॅश असेल. कंपनीने आत्तापर्यंत शेअर केलेल्या फोटोंमधून असं कळतंय की, हा फोन ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. फोटो फोनच्या उजव्या बॉर्डरवर पॉवर बटण आणि विरुद्ध दिशेला व्हॉल्यूम रॉकर असेल.
अधिकृत वेबसाइटवर स्मार्टफोनच्या लिस्टिंगने किंमत देखील उघड केली आहे. Lava Fire 5G ची किंमत भारतात 19,999 रुपये असेल. यासह, Lava Agni 5G लाँच होण्याआधी त्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. तथापि, डिव्हाइस एकाच मेमरी व्हेरियंटमध्ये येईल की वेगवेगळे RAM आणि स्टोरेज पर्यायांसह येईल, हे पाहावे लागेल.
Time for India to lead from the front! #AgniLaunchOn9thNov #LavaMobiles #ProudlyIndian pic.twitter.com/YqVw3Sq6p3
— Lava Mobiles (@LavaMobile) October 28, 2021
इतर बातम्या
Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश
दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय
(Lava Agni 5G smartphon to launched in India on november 9)