64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava ने आज (मंगळवार) आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. Lava Agni 5G असे या मोबाईलचे नाव आहे. तसेच या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत.

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट
Lava Agni 5G
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 9:25 AM

मुंबई : भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava ने आज (मंगळवार) आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. Lava Agni 5G असे या मोबाईलचे नाव आहे. तसेच या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये लेटेस्ट 5G टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये MediaTek डायमेंशन प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 64 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. (Lava first 5G smartphone Lava Agni 5G launched with 19999 rs price)

Lava Agni 5G ची किंमत आणि उपलब्धता

Lava Agni 5G ची किंमत 19,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे, परंतु कंपनीकडून या फोनवर विशेष सवलत दिली जाईल, त्यानंतर या फोनची किंमत 17,999 रुपये असेल. हा स्मार्टफोन लावाच्या अधिकृत वेबसाइट Lava वरून प्री-बुक करता येईल. मात्र, हा स्मार्टफोन कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन फेयरी ब्लू कलरमध्ये येतो.

Lava Agni 5G चे स्पेसिफिकेशन्स

Lava Agni 5G मध्ये 2.5D कर्व्ह ग्लाससह 6.78-इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 1080×2460 रिझोल्युशनसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कंपनीने या मोबाईलमध्ये MediaTek Dimension 810 चिपसेट दिला आहे. तसेच, यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे. हा फोन Android 11 आऊट ऑफ द बॉक्स वर काम करतो.

Lava Agni 5G चा कॅमेरा सेटअप

Lava Agni 5G च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे. यात 5 मेगापिक्सल्सचा सेकेंडरी कॅमेरा आहे, जी एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. यासोबतच इतर दोन 2-2 मेगापिक्सलचे कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो स्क्रीन फ्लॅश फीचर्ससह येतो. यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो क्लिक करण्यात मदत होईल.

Lava Agni 5G ची बॅटरी

Lava Agni 5G च्या बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000 mAh Li-Polymer बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जिंग क्षमतेसह येते. तसेच या स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. यात OTG सपोर्ट, ब्लूटूथ v 5.1 आणि टाइप सी यूएसबी कनेक्टिव्हिटी असे काही फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

सार्वजनिक वायफाय वापरताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; तुमचे खाते होऊ शकते हॅक

नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

(Lava first 5G smartphone Lava Agni 5G launched with 19999 rs price)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.