भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

भारतात 5G तंत्रज्ञानाबाबत अद्याप एकमत झालेलं नसताना, एलजी इलेक्ट्रॉनिक्सने सांगितले की, त्यांनी टेराहट्र्ज स्पेक्ट्रम वापरून 6G डेटा ट्रान्समिशन यशस्वीपणे केल्याचे दाखवून दिले आहे.

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 5:05 PM

मुंबई : भारतात 5G तंत्रज्ञानाबाबत अद्याप एकमत झालेलं नसताना, एलजी इलेक्ट्रॉनिक्सने सांगितले की, त्यांनी टेराहट्र्ज स्पेक्ट्रम वापरून 6G डेटा ट्रान्समिशन यशस्वीपणे केल्याचे दाखवून दिले आहे. दक्षिण कोरियाची ही टेक दिग्गज नेक्स्ट जनरेश कम्यूनिकेशन टेक्नोलॉजीत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. एलजी गेल्या आठवड्यात बर्लिनमध्ये युरोपातील लीडिंग अ‍ॅप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च ऑर्गनायजेशन फ्रॉनहोफर-गेसेलशाफ्टच्या मदतीने बाह्य वातावरणात 100 मीटर 6 जी टेराहट्र्ज वायरलेस कम्यूनिकेशन सिग्नल पाठवण्यात यशस्वी झाली आहे. (LG Successfully Demos 6G Data Transmission Using Terahertz Spectrum; know everything)

एलजीने म्हटले आहे की त्यांनी 6G टेराहर्ट्झ स्पेक्ट्रमवर स्थिर कम्यूनिकेशन सिग्नल देण्यासाठी Fraunhofer-Gesel शाफ्टसह नवीन पॉवर एम्प्लिफायर विकसित केले आहे. योनहॅप वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, अल्ट्रावाइड बँड स्पेक्ट्रममध्ये शॉर्ट फ्रिक्वेन्सी कव्हरेज रेंज आहे, तर अँटेना ट्रान्समिशन आणि रिसीव्हिंग प्रक्रियांमध्ये विजेचा गंभीर तोटा आहे, अशा समस्या सोडवण्यासाठी अ‍ॅडव्हान्स्ड पॉवर एम्प्लिफायर्सची मागणी आहे.

LG चा नवीन एम्प्लिफायर मॅक्सिमम आउटपुट देऊ शकतो

एलजीने सांगितले की, त्यांचा नवीन एम्प्लिफायर 155-175 गीगाहर्ट्झ बँडमध्ये स्थिर कम्यूनिकेशनसाठी 15 डेसिबल-मिलीवॅटचा मॅक्सिमम आउटपुट सिग्नल देऊ शकतो. 6G टेराहर्ट्झ वायरलेस कम्युनिकेशन परफॉर्मन्ससाठी अडॅप्टिव बीमफॉर्मिंग आणि हाय-गेन अँटेना स्विचिंग टेक्नॉलॉजी देखील विकसित केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

भारतात 5G नेटवर्कची सर्वत्र चर्चा, पण इंटरनेट स्पीड किती असणार?

हल्ली अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण स्मार्टफोन, इंटरनेट, वायफाय, नेटवर्क यांसारखे शब्द सहज उच्चारताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून अनेकजण 5G नेटवर्कबद्दल चर्चा करत आहेत. हे नेटवर्क फार सुपरफास्ट असेल असेही बोलले जात आहे. मात्र हे 5G नेटवर्क नक्की प्रभावी असणार का? ते कधी सुरु होणार? त्याचा स्पीड कसा असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या हातात मोबाईल यायला लागले. तो काळ 2G चा होता. मोबाईलमध्ये इंटरनेट होतं, परंतु खूप धिम्या गतीने ते चालायचं. त्यानंतर बाजारात 3G आलं, आणि लोकांना वेगवान इंटरनेट मिळू लागलं. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांसारख्या अनेक कंपन्यांनी 3 जी सेवा देऊ केल्या आणि त्यानंतर 4G तंत्रज्ञान आले. त्यानंतर आता 5G नेटवर्कची चर्चा सुरु आहे.

5G नेटवर्क म्हणजे पाचवी जनरेशन. या नेटवर्कमुळे आपले काम आणखी सोपे होणार आहे. 5G नेटवर्क कमीत कमी 20 gbps डाऊनलिंक आणि 10 gbps अपलिंकने चालेल, असे बोललं जात आहे. त्यामुळे आताच्या 4G नेटवर्कपेक्षा 40 पटीने जास्त स्पीड मिळेल.

इतर बातम्या

5G Testing | मुंबई, दिल्ली, कोलकात्यासह देशातील ग्रामीण भागातही 5G ट्रायल्स

5G संदर्भात सरकारचं आणखी एक पाऊल, Jio, Airtel सह ‘या’ बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर

5G बाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, सरकारचे कडक कारवाईचे आदेश

(LG Successfully Demos 6G Data Transmission Using Terahertz Spectrum; know everything)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.