Dream Job : हिम्मत-ए-मर्दा, तो…! मेटाने काढले, तरुणीला नोकरीचे तिकीट लागले

Dream Job : मोठ्या कंपन्यांसह जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांना मंदीचा फटका बसत आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. काही जणांचे नोकरीचे स्वप्न नेमकेच पूर्ण झाले होते आणि अवघ्या काही महिन्यांत त्यांना कामावरुन कमी करण्यात आले. पण या तरुणीचे नशीब जोरावर आहे. तिला जबरदस्त लॉटरी लागली आहे.

Dream Job : हिम्मत-ए-मर्दा, तो...! मेटाने काढले, तरुणीला नोकरीचे तिकीट लागले
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 4:00 PM

नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : अमेरिकेसह अनेक बलाढ्य अर्थव्यवस्था सध्या मंदी (Recession Time) सदृश्य परिस्थितीचा सामना करत आहे. महागाईने चढाई केली आहे. तर नोकऱ्यांवर पण गदा येते आहेत. मोठं-मोठ्या टेक कंपन्यांनी (Technology Companies) नोकर कपातीचे धोरण या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अंगिकारले. अनेकांना तर नुकतीच नोकरी लागली होती. शिक्षण पूर्ण होताच अनेकांचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले. पण ते टिकले नाही. अवघ्या काही महिन्यांत त्यांना नोकरी सोडावी लागली अथवा त्यांना कामावरुन कमी करण्यात आले. पण या तरुणीच्या उदाहरणावरुन अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. भगवान के घर देर है, पर अंधेर नही, असे म्हणतात, त्याचा प्रत्यय या तरुणीला आला आहे. मेटाने (Meta Inc) तिला कमी केल्यानंतर तिला ड्रीम जॉब (Dream Job) मिळाला आहे. त्यासाठी ती थेट युरोपमध्ये पोहचणार आहे. पण त्यासाठी तीला पाच महिने वाट पहावी लागली.

कोण आहे ही तरुणी

तर ही आशावाद जागवणारी कथा आहे हो झुओनी हर्मिओनी (Hou Zhuoni Hermionee) या तरुणीची. ती मुळची सिंगापूरची आहे. तीने तंत्रज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिंगापूर येथील मेटा कंपनीत तीला नोकरी लागली. तीन प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. पण मेटाने अनेकांना नारळ दिला. त्यात हो चा पण क्रमांक होता. ती नवीन नोकरीच्या शोधात होती. त्यासाठी तीने अनेक ठिकाणी दरवाजा ठोठावला. पण तिच्या पदरी निराशा पडली. तीने चिकाटी सोडली नाही. सिंगापूरमध्ये नाही तर युरोपमध्ये आता तिला आवडत्या कंपनीत नोकरी मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

आनंद पोटात माझ्या माईना

तर हो हिला मेटाने कामावरुन कमी केल्यानंतर ती गेल्या पाच महिन्यांपासून चांगल्या जॉबच्या शोधात होती. अखेर तिला चांगली संधी चालून आली. तिला आवडती कंपनी गुगलमध्ये नोकरीची ऑफर मिळाली. आता तिचे नोकरीचे ठिकाण बदलले आहे. ती आर्यलंडमधील गुगलच्या कार्यालयात नोकरी करणार आहे. त्यासाठी ती 16 तासांचा प्रवास करुन नोकरीचे ठिकाण गाठणार आहे. तिचा आशावादी प्रवास तिने सर्वांसाठी LinkedIn वर पोस्ट लिहून शेअर केला. आता तिला आकाश ठेंगणे झाले आहे. तिची निराशा कुठल्या कुठे पळून गेली आहे. तिची पोस्ट वाचताना तिच्या भावनांचा अंदाज येतो.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.