Flipkart Big Saving Days : Micromax च्या नवीन स्मार्टफोनवर शानदार डिस्काऊंट

Flipkart चा बिग सेव्हिंग डेज सेल सध्या सुरु आहे. या सेलचा एक भाग म्हणून 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येणाऱ्या Micromax IN 2b ची किंमत 8,499 रुपये आणि 6GB RAM प्लस 64GB स्टोरेजसह येणाऱ्या Micromax IN 2b ची किंमत 9,499 रुपये इतकी असेल.

Flipkart Big Saving Days : Micromax च्या नवीन स्मार्टफोनवर शानदार डिस्काऊंट
Micromax In 2b
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 5:44 PM

मुंबई : भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Micromax ने आपला परवडणारा स्मार्टफोन Micromax IN 2b लॉन्च केला आहे. फोनमध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.52 इंचाचा डिस्प्ले आहे. IN 2B 6GB पर्यंत रॅम पर्यायासह येतो आणि फोनच्या परफॉर्मन्ससाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये Unisoc T610 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. (Micromax IN 2b smartphone is available on Flipkart with 500 rupees discount)

Flipkart चा बिग सेव्हिंग डेज सेल सध्या सुरु आहे. या सेलचा एक भाग म्हणून 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येणाऱ्या Micromax IN 2b ची किंमत 8,499 रुपये आणि 6GB RAM प्लस 64GB स्टोरेजसह येणाऱ्या Micromax IN 2b ची किंमत 9,499 रुपये इतकी असेल. दोन्ही स्मार्टफोन व्हेरिएंटची मूळ किंमत अनुक्रमे 8,999 रुपये आणि 9,999 रुपये इतकी आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सवर 500 रुपयांचा डिस्काऊंट आहे. फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल 16 डिसेंबरपासून सुरू झाला आहे आणि 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे,

Micromax IN 2b चे स्पेसिफिकेशन्स

Micromax IN 2B मध्ये 6.52 इंचाचा Mini Drop HD+ डिस्प्ले आहे ज्याचा मॅक्सिमम ब्राईटनेस 400 nits इतका आहे. Micromax IN 2b ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. IN 2b mali G52 GPU सह ARM Cortex A75 आर्किटेक्चर आधारित ऑक्टा कोर प्रोसेसरवर चालतो.

याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलला ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोन युनिसोक टी 610 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम असे दोन पर्याय आहेत. यात पॉवरसाठी 5000 एमएएचची बॅटरी दिली आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी यात USB Type-C पोर्ट, Wi-Fi 802.11 ac, ब्लूटूथ व्हर्जन 5 ड्युअल VoWiFi आणि ड्युअल VoLTE सपोर्ट समाविष्ट आहे. आणि सुरक्षिततेसाठी, ग्राहकांना या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्ट देखील मिळतो.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Micromax IN 2b smartphone is available on Flipkart with 500 rupees discount)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.