मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘या’ भारतीय रिसर्चरला दिले 36 लाखांचे इनाम, …नाहीतर युजर्सचे अकाऊंट झाले असते हॅक

मायक्रोसॉफ्ट कंपनीने 'या' भारतीय रिसर्चरला दिले 36 लाखांचे इनाम, ...नाहीतर युजर्सचे अकाऊंट झाले असते हॅक (Microsoft gives Rs 36 lakh reward to Indian researcher)

मायक्रोसॉफ्ट कंपनीने 'या' भारतीय रिसर्चरला दिले 36 लाखांचे इनाम, ...नाहीतर युजर्सचे अकाऊंट झाले असते हॅक
ही प्रसिद्ध कंपनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना आराम करण्यासाठी देतेय एक आठवड्याची सुट्टी
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 2:44 PM

नवी दिल्ली : भारतीय रिसर्चर लक्ष्मण मुथैया यांच्यासाठी आजचा दिवस आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखा आहे. कारण, मुथैया यांच्या नशिबाचे दरवाजे उघडले व त्यांना जणू 36 लाख रुपयांची लॉटरी लागली. मुथैया यांनी कंपनीच्या सिस्टममधील मोठी तांत्रिक समस्या शोधून काढली. त्यावर खूश होउन कंपनीने मुथैया यांना 36 लाख रुपयांचे बक्षिस दिले. सिस्टममधील त्रुटीमुळे कोणत्याही युजर्सचे मायक्रोसॉफ्ट अकाउंट हॅक होऊ शकले असते. विशेष म्हणजे कंपनीला या फसवणुकीचा काहीच थांगपत्ता लागला नसता. मुथैया यांनी वेळीच अ‍ॅलर्ट केल्यामुळे कंपनीची सिस्टम सुरक्षित राहिली. (Microsoft gives Rs 36 lakh reward to Indian researcher)

रिसर्चर मुथैया यांनी नोंदवलेले निरीक्षण

मुथैया यांच्या म्हणण्यानुसार, मायक्रोसॉफ्टच्या सिस्टममधील त्रुटीमुळे कोणत्याही युजर्सचे अकाऊंट हॅक होऊ शकले असते. त्यांनी सुरुवातीला इन्स्टाग्राम रेट लिमिटिंगचासुद्धा थांगपत्ता लावला होता. त्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट यूजर्सच्या अकाउंटचा शोध घेतला. हे अत्यंत छोटे बग्स होते, मात्र धोकादायक होते, असे मुथैया यांनी म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्टची बक्षिस योजना नेमकी कशी आहे?

मायक्रोसॉफ्टने मुथैया यांना हॅकरवन बिग बाउंटी उपक्रमांतर्गत 36 लाख रुपयांचे बक्षिस दिले आहे. रेडमॉन्ड आधारित टेक जाएंटने 1500 डॉलर्स आणिा 100,000 डॉलर यादरम्यान बक्षिस ठेवले आहे. जो कोणी मायक्रोसॉफ्टच्या त्रुटी निदर्शनास आणून देतो, त्याला या उपक्रमांतर्गत बक्षिस म्हणून पैसे दिले जातात. मुथैया यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्टनेयासंबंधी खूप तत्पर कार्यवाही सुरू केली. नोव्हेंबर 2020 मध्ये मला एक केस देण्यात आली होती. ही केस सिक्युरिटी इम्पॅक्टशी निगडीत होती. मात्र त्या केसवर मी खूश नव्हतो. कारण मला जे पाहिजेय, ते मिळत नव्हते. त्यानंतर कंपनीशी मी सिक्युरिटी इम्पॅक्टसंबंधी बोलणी केली आणि त्यांना सिक्युरिटी इम्पॅक्टमध्ये बदल करण्यास सांगितले. यासंदर्भात काही ईमेल्स पाठवल्यानंतर माझी इलेव्हेशन ऑफ प्रिव्हिलेजसाठी निवड करण्यात आली.

मुथैया यांनी आपल्या ब्लॉगवरील पोस्टमध्ये शेवटी म्हटले आहे की, मी या बक्षिसासाठी डॅन, जॅरेक आणि संपूर्ण एमएसआरसी टीमला धन्यवाद देतो. या लोकांनी माझे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले आणि समस्या दूर करण्यासाठी मदत केली. याचवेळी मी बाऊंटी उपक्रमालाही धन्यवाद देऊ इच्छितो, असे मुथैया यांनी नमूद केले आहे. (Microsoft gives Rs 36 lakh reward to Indian researcher)

इतर बातम्या

शाओमीचा रिअलमीच्या सीईओवर खोटे बोलण्याचा आरोप, कंपनीने ट्विटरवर शेअर केले प्रकरण

IPL 2021 | CSK आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सज्ज, ट्रेनिंग कॅंपसाठी धोनीसह युवा खेळाडू चेन्नईत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.