Emergency Alert : एकाच वेळी वाजले लाखो फोन, का आला इमर्जन्सी अलर्ट
Emergency Alert : तुमचा पण फोन जोरात वाजला का, आज देशातील लाखो नागरिकांचे फोन वाजले, काय आहे आहे इमर्जन्सी अलर्ट, 15 दिवसांनी हा मॅसेज आला, त्यामागील कारण तरी काय?
नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : शुक्रवारी दुपारी 12 वाजता देशातील लाखो नागरिकांचे फोन वाजले. 15 सप्टेंबर रोजी जो तो त्याच्या कामात गुंग असताना अनेक नागरिकांच्या मोबाईलची रिंग (Mobile Ring) वाजली. केंद्र सरकारने मोबाईलधारकांना अलर्ट पाठवला. तुमच्या पण फोनवर हा इमर्जन्सी अलर्ट वाजला असेल. त्यामुळे मोबाईलमध्ये मोठ्याने बिप आवाज झाला. Emergency Alert: Severe फ्लॅश मॅसेजमुळे ही रिंग वाजली. या मॅसेजचा अर्थ असा नाही की, एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली. तर केंद्र सरकार सध्या नागरिकांना टेस्टिंग मॅसेज पाठवत आहे. केंद्र सरकारमधील दूरसंचार विभागाच्या ब्रॉडकास्टिंग सिस्टमद्वारे हा मॅसेज पाठवण्यात आला आहे. या फ्लॅश मॅसेजमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, हा मॅसेज दुर्लक्षित करा. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी काहीच करु नये.
हा तर ट्रायल मॅसेज
दूरसंचार विभागाने हा मॅसेज का पाठविण्यात आला, याची माहिती दिली आहे. त्यानुसार, हा केवळ चाचणी संदेश आहे. टेस्टिंग मॅसेज आहे. तो ब्रॉडकास्टिंग सिस्टमद्वारे पाठविण्यात आला आहे. सध्या या मॅसेजची चाचपणी सुरु आहे. हा मॅसेज पाठविण्यामागे भविष्यात भूकंप, महापूर वा इतर नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास नागरिकांना अलर्ट करण्यात येणार आहे. या मॅसेजनुसार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, NDMA ने संपूर्ण भारतासाठी ही आपत्कालीन स्थितीत संदेश पाठविण्यासाठीची व्यवस्था केली आहे.
30 मिनिटात तीनदा अलर्ट
एंड्रॉईड वापरकर्त्यांना हा अलर्ट मॅसेज 15 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा 12:15 मिनिटांनी आला. 12: 45 मिनिटांना हा अलर्ट तीनवेळा आला. हा मॅसेज काही लोकांच्या मोबाईलवर अनेकदा आला. तर काही नागरिकांच्या मोबाईलवर असा कोणताही मॅसेज आलेला नाही. त्यांना अलर्ट मिळाला नाही. हा अलर्ट सध्या काही एंड्रॉईड युझर्सच्या मोबाईलवर येत असल्याचे दिसून येत आहे.
मोबाईलमध्ये अशी करा सेटिंग
स्मार्टफोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर बाय डिफॉल्ट सुरुच असतो. पण जर तुमच्या मोबाईलमध्ये इमर्जन्सी अलर्ट येत नसेल तर सेटिंगमध्ये बदल करावा लागेल. स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये सेफ्टी अँड इमर्जन्सी सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर इनेबल करावे लागेल.
घाबरण्याची, चिंता करण्याचा नाही गरज
केंद्र सरकारकडून हा अलर्ट मॅसेज केवळे चाचपणीसाठी पाठविण्यात आला आहे. हा मॅसेज पाहून घाबरण्याची गरज नाही वा चिंता करण्याची पण गरज नाही. तर हा मॅसेज भविष्यात तुमच्यासाठी महत्वाचा राहणार आहे. भविष्यात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी, जसे भूकंप, महापूर यासाठी हा अलर्ट महत्वाचा ठरणार आहे. दूरसंचार विभाग हा मॅसेज पाठवत आहे.