YouTube लोगोऐवजी 1 लाख कोटी हा आकडा दिसतोय? जाणून घ्या त्यामागचं कारण

यूट्यूबचे पेज ओपन केल्यावर लोगोच्या जागी 1 ट्रिलियन (1 लाख कोटींचा) आकडा दिसल्याने यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. याचं कारण काय? असा प्रश्न अनेक युजर्सना पडला आहे.

YouTube लोगोऐवजी 1 लाख कोटी हा आकडा दिसतोय? जाणून घ्या त्यामागचं कारण
YouTube
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 7:34 PM

मुंबई : यूट्यूबचे पेज ओपन केल्यावर लोगोच्या जागी 1 ट्रिलियन (1 लाख कोटींचा) आकडा दिसल्याने यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. याचं कारण काय? असा प्रश्न अनेक युजर्सना पडला आहे. खरंतर यूट्यूब Minecraft या व्हिडीओ गेमच्या मोठ्या यशाचं सेलिब्रेशन करत आहे. Minecraft हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी व्हिडीओ गेम आहे आणि आता या क्रिएटिव्ह सँडबॉक्स सर्व्हायव्हल गेमने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या गेमचा व्हिडीओ YouTube वर 1 ट्रिलियन (1 लाख कोटी) वेळा पाहिला गेला आहे. (Minecraft crosses 1 trillion views on YouTube, become most popular game on platform)

Tetris, Mario, आणि Grand Theft Auto सोबत, Minecraft हा आतापर्यंतचा सर्वाधिक विकला जाणारा गेम आहे. यामुळे यूट्यूबच्या लोगोसह 1 ट्रिलियन लिहिलेले दिसत आहे. हा वर्ल्ड बिल्डिंग गेम 2009 मध्ये Google च्या व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिसवर पहिल्यांदा पाहायला मिळाला होता आणि आता प्लॅटफॉर्मवरील सर्वात मोठ्या कम्यूनिटीपैकी एक बनला आहे. YouTube ने सांगितले की 150 देशांमध्ये Minecraft वर व्हिडिओ बनवणारे 35,000 हून अधिक अॅक्टिव्ह क्रिएटर चॅनेल आहेत. पीसी, मोबाइल डिव्हाइस आणि व्हिडिओ गेम कन्सोलवर Minecraft खेळणाऱ्या 140 मिलियन लोकांमध्ये हे सर्वात अधिक आहे.

Minecraft सर्वाधिक पाहिला जाणारा सब्जेक्ट

Apple, Google आणि Microsoft सारख्या टेक कंपन्या 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या आहेत, तेव्हा ही आणखी एक कंपनी यांना टक्कर देऊ पाहात आहे. Mojang Studios साठी, स्टॉकहोम-बेस्ड डेव्हलपमेंट टीमने Minecraft तयार केले आहे. ही एक जबरदस्त उपलब्धी आहे की गेम सातत्याने वाढत आहे. ऑगस्ट 2021 मध्ये, Minecraft च्या मासिक सक्रिय युजर्सची संख्या 141 मिलियन्सपेक्षा जास्त होती. Minecraft हा सर्वात जास्त पाहिलेला सब्जेक्ट आहे. 2021 च्या अखेरीस गेमने एकूण एक ट्रिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.

Mojang Studios च्या मुख्य स्टोरीटेलर लिडिया विंटर्स म्हणाल्या, “सुमारे एक दशकापूर्वी, सात जणांच्या टीमने YouTube वर करिअर म्हणून Minecraft बद्दल व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आणि आता ते वाढतच जात आहे.

2014 मध्ये Mojang ची 2.5 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केल्यापासून, गेमचे आकर्षण वाढतच गेले. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यावेळी म्हणाले की, “Minecraft हे एका उत्तम गेम फ्रँचायझीपेक्षा बरेच काही आहे, ते एक खुले व्यासपीठ आहे.” तेव्हापासून गेममध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे मायक्रोसॉफ्ट आणि यूट्यूबने म्हटले आहे.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Minecraft crosses 1 trillion views on YouTube, become most popular game on platform)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.