Google Pay । आता गूगल पे वरुन अमेरिकेतून भारतात पैसे पाठवता येणार, असे होईल मनी ट्रान्सफर

परदेशातून पैसे हस्तांतरीत करण्यात वेस्टर्न युनियन ही सर्वोच्च कंपनी आहे आणि या कामात तिचे प्रथम स्थान आहे. हे कार्य डिजिटल करण्यासाठी आता गुगलने वेस्टर्न युनियन आणि वाईज सोबत भागीदारी केली आहे. (Money transfer will now be possible to send money from US to India through Google Pay)

Google Pay । आता गूगल पे वरुन अमेरिकेतून भारतात पैसे पाठवता येणार, असे होईल मनी ट्रान्सफर
Google Pay वर तुमचा UPI पिन कसा बदलावा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 9:06 AM

नवी दिल्ली : मनी ट्रान्सफर अॅप गुगल पेने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. आता अमेरिकेत बसलेला एखादा माणूस आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना भारतात सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकणार आहे. भारताबरोबरच ही सुविधा सिंगापूरमधील लोकांनाही मिळणार आहे. पैशांची ही ट्रान्सफर वाईज आणि वेस्टर्न युनियन कंपन्यांमार्फत केली जाईल. गुगल पे चे म्हणणे आहे की, येत्या काही महिन्यांत ही सेवा वाईज कंपनीमार्फत 80 देशांत आणि वेस्टर्न युनियनमार्फत 200 देशांमध्ये दिली जाईल. या देशांमध्ये या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफरची सुविधा सुरू होईल. आपण पैशांच्या हस्तांतरणासाठी संपूर्ण जागतिक बाजाराकडे नजर टाकल्यास यामध्ये गूगलचा वाटा 470 अब्ज डॉलर्स आहे. परदेशातून पैसे हस्तांतरीत करण्यात वेस्टर्न युनियन ही सर्वोच्च कंपनी आहे आणि या कामात तिचे प्रथम स्थान आहे. हे कार्य डिजिटल करण्यासाठी आता गुगलने वेस्टर्न युनियन आणि वाईज सोबत भागीदारी केली आहे. ही भागीदारी आंतरराष्ट्रीय स्तरावर पैशांचे हस्तांतरण सोपे आणि सुलभ करेल. (Money transfer will now be possible to send money from US to India through Google Pay)

किती वापरकर्त्यांना याचा फायदा होईल

रॉयटर्सच्या अहवालानुसार जगभरात गूगल पे चे 40 देशांमध्ये 150 दशलक्ष वापरकर्ते आहेत. कोरोना साथीच्या काळात ऑनलाईन पैशांच्या हस्तांतरणामध्ये वाढ झाली असून याचा फायदा गुगल पे सारख्या कंपन्या घेत आहेत. तथापि, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षातील आकडेवारी पाहिल्यास, उत्पन्न कमी झाले आहे आणि पैसे पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जगातील सर्व स्थलांतरीत लोक आपल्या घरी पाठवत असलेल्या पैशांमध्ये 14% घट दिसून येत आहे. आर्थिक परिस्थितीतील गडबड झाल्यामुळे हे घडले आहे कारण रोजगारात घट झाली आहे, नोकऱ्याही गेल्या आहेत.

अनेक कंपन्या आहेत बाजारात

अमेरिकन कंपनी गूगल पे ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपले अ‍ॅप रिडिझाईन केले होते आणि त्यात बर्‍याच बँका समाविष्ट केल्या आहेत. त्याअंतर्गत वेस्टर्न युनियन आणि वाईज कंपनीबरोबर भागीदारी स्थापन केली गेली आहे. एएनटी ग्रुप, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, अॅपल आयएसी आणि पेपाल होल्डिंग्स सारख्या कंपन्याही मनी ट्रान्सफरच्या व्यवसायात गुंतल्या आहेत. आता गूगल पे आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करत आहे, त्यामुळे सर्व कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा दिसून येईल.

गूगल काय म्हणाले?

या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतील लोक भारतात पैसे पाठवू शकतील, असे गुगल प्लेने म्हटले आहे. असे लोक वेस्टर्न युनियनच्या नेटवर्कचा आधार घेऊ शकतात. या बँकेची 125 देशांमध्ये कोट्यावधी खाती आणि लाखो वॉलेट आहेत. गूगल पे अ‍ॅपवर फक्त एका क्लिकवर काही वेळात पैसे हस्तांतरीत करु शकणार आहे. वेस्टर्न युनियनकडे जगातील 200 देशांमध्ये सुमारे 5 लाख रिटेल लोकेशन आहेत, जिथून पैसे हस्तांतरणाचे काम होते. वेस्टर्न यूनियन क्रॉस कंट्री आणि क्रॉस चलन पेमेंट ट्रान्सफर प्लॅटफॉर्म आहे. गुगल पेद्वारे लोक सुरक्षित आणि लवकर पैसे हस्तांतरीत करु शकतील.

पैसे ट्रान्सफर कसे करावे?

– नवीन अ‍ॅप रीडिझाइननंतर आपण अपडेट न केल्यास, प्ले स्टोअरवरून गूगल पे चे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा. – आता अ‍ॅपची सेटिंग्ज करा. गूगलने दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून बँक खात्याचा तपशील सेट करा. – गूगल पे अ‍ॅपमध्ये एक पे बटण असेल, जिथे आपणास वेस्टर्न युनियन किंवा वाईज निवडण्याचा पर्याय मिळेल. – आपल्याला अ‍ॅपवर सूचना देण्यात येतील, ज्याचे अनुसरण केले पाहिजे आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी. हे डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती विचारते. (Money transfer will now be possible to send money from US to India through Google Pay)

इतर बातम्या

एकाच घरात विरोधक-सत्ताधारी, पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता, दोघं शिवसैनिक, जळगावातील अनोखं राजकारण

ऑटो पार्ट्स बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी 6000 कोटींचा IPO आणणार, तुमच्यासाठी बंपर कमाईची संधी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.