चीटिंग करणाऱ्या युजर्सना PUBG चा दणका, 12 लाख अकाऊंट्स बॅन

PUBG मोबाइल पब्लिशर टॅन्सेंटने नुकतेच जाहीर केले आहे की, त्यांनी गेल्या आठवड्यात 12 लाख अकाऊंट्सवर कायमस्वरुपी बंदी घातली आहे.

चीटिंग करणाऱ्या युजर्सना PUBG चा दणका, 12 लाख अकाऊंट्स बॅन
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 7:37 PM

मुंबई : चिटींग आणि हॅक्सचा वापर करणाऱ्या युजर्सवर PUBG ची कारवाई सुरुच आहे. गेल्या महिन्यात PUBG मोबाइल पब्लिशर टॅन्सेंट होल्डिंग्सने घोषणा केली होती की, त्यांनी 2 मिलियन अकाऊंट्सवर (20 लाख अकाऊंट्स) बंदी घातली आहे. कंपनीने ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली होती. या ट्विटमध्ये कंपनीने म्हटलं होतं की, 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत चिटिंग आणि हॅक्सचा वापर करणाऱ्या 20 लाख अकाऊंट्सवर आम्ही कारवाई केली आहे. हे सर्व अकाऊंट्स आम्ही पूर्णपणे बॅन केले आहेत. ही कारवाई अजूनही सुरुच आहे. कारण कंपनीने चिटींग आणि हॅक्सचा वापर करणाऱ्या आणखी 12 लाख युजर्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कंपनीने या 12 लाख युजर्सना बॅन केलं आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यात कंपनीने आतापर्यंत 32 लाख युजर्सना बॅन केलं आहे. (More than 12 lakh PUBG Mobile Game accounts have been banned)

PUBG Mobile हा जगभरातील सर्वात पसंतीचा मोबाईल गेम आहे. या बॅटल गेमचा जगभरातील फॅनबेस हा 60 कोटी युजर्सचा आहे. असे असूनही सातत्याने या गेमसमोरील अडचणी वाढत आहेत. सुरुवातीला भारतात हा गेम बॅन करण्यात आला. त्यामुळे पबजीने त्यांचे लाखो युजर्स गमावले. त्यानंतर आता कंपनी सातत्याने हॅकर्सशी लढत आहे. अनेक हॅकर्स PUBG Mobile गेम क्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी चिटींगचे नवनवीन हातकंडे वापरत आहेत. कंपनीने अशा युजर्सविरोधात आता कारवाईचा बडगा उगारला आहे. Tencent कंपनीने आता 12 लाख 17 हजार 342 अकाऊंट्स सस्पेंड केली आहेत. कंपनीने म्हटलं आहे की, 8 ते 14 जानेवारीदरम्यान लेटेस्ट अँटी-चिटींग रिपोर्ट पाहून चिटींग करणाऱ्या युजर्सवर कारवाई केली आहे. तसेच कंपनीने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, जर कोणी पबजी मोबाईल गेमसोबत छेडछाड करत असेल, हॅक्सचा वापर करत असेल तर त्याचं अकाउंट सस्पेंड केलं जाईल.

अशा युजर्सवर कायमस्वरुपी बंदी

कंपनीने म्हटलं आहे की, बॅन केलेल्या अकाउंट्सपैकी 48 टक्के युजर्स हे हॅकिंगचा वापर करुन गेमचं कॅरेक्टर मॉडेल बदलण्याचा प्रयत्न करत होते. 22 टक्के युजर्स एक्स-रे व्हिजनचा वापर करत होते. 12 टक्के युजर्सनी स्पीड हॅक आणि 7 टक्के युजर्सनी एरिया डॅमेजचा प्रयत्न केला होता. दरम्यान Tencent कंपनीने सांगितले आहे की, बॅन केलेल्या युजर्सपैकी 3 टक्के युजर्स Conqueror, 6% Ace, 10% क्राऊन, 12% डायमंड, 11% प्लॅटिनम, 9% गोल्ड, 11% सिल्वर आणि 38% युजर ब्रॉन्झ रँकमधील होते.

डिसेंबरमध्ये 20 लाख अकाऊंट्सवर बंदी

दरम्यान, कंपनीने गेल्या महिन्यात बॅन केलेल्या 2 मिलियन अकाऊंट्सपैकी 31 टक्के युजर्सनी त्यांचं कॅरेक्टर मॉडेल मॉडिफाय केलं होतं, तर 18 टक्के युजर्स असे होते ज्यांनी X-ray व्हिजन चीट्सचा वापर केला होता. तसेच ऐम हॅक्स, स्पीड हॅक्स आणि एरिया ऑफ डॅमेज मॉडिफाय करणाऱ्या हॅक्सचा वापर केल्याबद्दल कंपनीने ही कारवाई केली आहे. बॅन केलेल्या अकाऊंट्सपैकी एक चतुर्थांश अकाऊंट्स ब्रॉन्झ टीयरवाले होते. तर डायमंड टीयर आणि प्लॅटिनम टीयरवाले अकाऊंट्स क्रमशः 17 आणि 15 टक्के होते. यापूर्वी कंपनीने ऑगस्टमध्येदेखील असेच काही अकाऊंट्स बॅन केले होते. तसेच त्यावेळी काही स्पेसिफिक डिव्हाइसमध्ये गेम खेळण्यावर बंदी घातली होती.

PUBG Mobile In ला सरकारकडून अप्रूव्हल

मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारने PUBG Mobile India या गेमला अप्रूव्ह केलं आहे. PUBG Mobile India Private Ltd. या नावाने हा गेम भारतात रजिस्टर केला आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट अफेयर्सच्या वेबसाईटवर हा गेम CIN सह रजिस्टर करण्यात आला आहे. हा गेम केवळ भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी PUBG Corporation चिनी कंपनी Tenncent सोबत कोणतीही भागिदारी करणार नाही.

PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

PUBG च्या पॅरेंट कंपनीची भारतात मोठी गुंतवणूक

Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला, पोराने PUBG गेममध्ये 16 लाख उडवले

PUBG गेम खेळू दिला नाही, मुलाने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले

PUBG ला आता FAU-G चा पर्याय, अक्षय कुमारकडून मोठी घोषणा

(More than 12 lakh PUBG Mobile Game accounts have been banned)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.