फिशिंगसाठी मायक्रोसॉफ्टच्या नावाचा सर्वाधिक वापर; अहवालात झाला खुलासा

फिशिंग हल्ल्यांपैकी जवळपास 45 टक्के फिशिंग हल्ले मायक्रोसॉफ्टशी संबंधित असल्याची माहिती संशोधकांच्या अहवालातून उघडकीस आली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण सहा अंकांनी अधिक असल्याचीही माहिती समोर आली आहे.

फिशिंगसाठी मायक्रोसॉफ्टच्या नावाचा सर्वाधिक वापर; अहवालात झाला खुलासा
फिशिंगसाठी मायक्रोसॉफ्टच्या नावाचा सर्वाधिक वापर
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 3:50 PM

नवी दिल्ली : सायबर गुन्हेगारांनी युजर्सची वैयक्तिक माहिती किंवा पेमेंट क्रेडेंशियल्सची चोरी करण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या नावाचा सर्वाधिक वापर केल्याचा खुलासा संशोधकांनी अहवालात केला आहे. संशोधकांनी गुरुवारी सांगितले की, मायक्रोसॉफ्ट एप्रिल ते जून या तिमाहीत फिशिंग हल्ल्यांसाठी सर्वात अनुकरणीय ब्रँड राहिला आहे, कारण सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक व्यवहाराचा तपशील चोरी करण्यासाठी या ब्रँडचा वापर करीत होते. फिशिंग हल्ल्यांपैकी जवळपास 45 टक्के फिशिंग हल्ले मायक्रोसॉफ्टशी संबंधित असल्याची माहिती संशोधकांच्या अहवालातून उघडकीस आली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण सहा अंकांनी अधिक असल्याचीही माहिती समोर आली आहे. (Most use of Microsoft name for phishing; The report revealed)

डीएचएल सायबर गुन्हेगारांनी टार्गेट केलेली दुसरी कंपनी

चेक पॉईंट रिसर्चच्या (सीपीआर) मते, डीएचएल ही शिपिंग कंपनी सायबर गुन्हेगारांनी टार्गेट केलेली दुसर्‍या क्रमांकाचा ब्रँड बनली आहे. या कंपनीशी संबंधित फिशिंग हल्ल्यांचे प्रमाण जवळपास 26 टक्के आहे. अलीकडच्या काळात लोकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल वाढला आहे. सायबर गुन्हेगार लोकांच्या याच भरवशाचा गैरफायदा घेऊ लागले आहेत. चेक पॉईंट सॉफ्टवेअरचे डेटा रिसर्च ग्रुप मॅनेजर ओमर डेम्बिन्स्की यांनी याबाबत सांगितले की, सायबर गुन्हेगार प्रमुख ब्रॅण्ड्सचे रूप धारण करून लोकांचा वैयक्तिक डेटा चोरण्याचे आपले प्रयत्न सातत्याने वाढवत आहेत. वास्तवात दुसऱ्या तिमाहीत अमेझॉन प्राइम डेपूर्वी अमेझॉनसंबंधी सुमारे 2,300 हुन अधिक नवीन डोमेनची नोंदणी करण्यात आली होती.

दुसऱ्या तिमाहीत अमेझॉन तिसऱ्या क्रमांकावर

दुसर्‍या तिमाहीत अमेझॉन फिशिंगच्या 11 टक्के हल्ल्यांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. डेम्बिन्स्की म्हणाले की, Q2 अर्थात दुसऱ्या तिमाहीमध्ये आम्ही रॅन्समवेअर हल्ल्यांमध्ये जागतिक पातळीवरदेखील वाढ पाहिली, टेक्नॉलॉजी सेक्टर अजूनही सर्वात जास्त फिशिंग हल्ले होणारे क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ शिपिंग आणि रिटेल या क्षेत्रांचा नंबर लागतो.

सोशल मीडियातील वाढती सायबर गुन्हेगारी मोठी डोकेदुखी

ब्रँड फिशिंग हल्ल्यात गुन्हेगार वास्तविक साईटप्रमाणे समान डोमेन नाव किंवा यूआरएल आणि वेब पृष्ठ डिझाइनचा वापर करतात. या माध्यमातून एका सुप्रसिद्ध ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटची तोतयागिरी करण्याचा प्रयत्न करतात. बनावट वेबसाइटची लिंक ईमेलद्वारे किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे टार्गेट करायच्या लोकांपर्यंत पाठवली जाते. युजर्सना वेब ब्राउझिंगदरम्यान पुनर्निर्देशित केले जाऊ शकते किंवा बनावट मोबाईल अँप्लिकेशनमार्फत ट्रिगर केले जाऊ शकते. बनावट वेबसाइट्समध्ये सर्रास वापरकर्त्यांचा दाखला, पेमेंट तपशील किंवा इतर वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी अनेकदा एक फॉर्म असतो, असेही संशोधकांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. सोशल मीडियातील वाढती सायबर गुन्हेगारी सुरक्षा यंत्रणासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. (Most use of Microsoft name for phishing; The report revealed)

इतर बातम्या

आधार कार्डवरील पत्ता कोणत्याही झंझटशिवाय बदला, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

केंद्र शासनाच्या निर्णयाला विरोध, मुंबई APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य बाजरात शुकशुकाट, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.