8GB+128GB, 50MP कॅमेरा, बहुप्रतीक्षित Moto G71 5G बाजारात, उरले फक्त काही तास

Motorola कंपनी भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन Moto G71 5G लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन आज (10 जानेवारी) सादर केला जाईल. याशिवाय, आगामी स्मार्टफोन Moto G71 5G चे एक सपोर्ट पेज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर जारी करण्यात आले आहे.

8GB+128GB, 50MP कॅमेरा, बहुप्रतीक्षित Moto G71 5G बाजारात, उरले फक्त काही तास
Moto G71 5G (Photo - Flipkart)
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 10:51 AM

मुंबई : Motorola कंपनी भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन Moto G71 5G लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन आज (10 जानेवारी) सादर केला जाईल. याशिवाय, आगामी स्मार्टफोन Moto G71 5G चे एक सपोर्ट पेज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर जारी करण्यात आले आहे. ज्याद्वारे फोटो, डिझाइन आणि अनेक फीचर्सबाबतची माहिती जाहीर केली आहे. (Moto G71 5G launching todays, know price and features)

Moto G71 हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 695 सह लाँच केला जाणार आहे. Moto G71 युरोपमध्ये 299.99 युरो (जवळपास 25,200 रुपये) किंमतीसह लाँच करण्यात आला. चीनी बाजारात, स्मार्टफोनची किंमत 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी 1,699 (जवळपास 20,000 रुपये) होती. दरम्यान, एका टिपस्टरने या भारतात लाँच होणाऱ्या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा केला आहेत. टिपस्टर अभिषेक यादवने ट्विटरवर आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये G71 ची किंमत उघड केली आहे. अभिषेकच्या लेटेस्ट पोस्टमध्ये, स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपये असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय, त्याने म्हटले आहे की, G71 केवळ फ्लिपकार्टवरुनच विकला जाईल.

मोटोरोला भारतात एकापाठोपाठ एक नवीन प्रोडक्ट्स लाँच करत आहे. Moto G31 आणि Moto G51 लाँच केल्यानंतर, Motorola कंपनी लवकरच Moto G71 हा स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लाँच करू शकते. लेनोवोच्या मालकीच्या कंपनीने जागतिक बाजारात एकूण पाच स्मार्टफोन लॉन्च केले होते. भारतात आतापर्यंत पाचपैकी फक्त दोनच स्मार्टफोन्सचे अनावरण झाले आहेत.

Moto G71 चे संभाव्य स्पेक्स

हा स्मार्टफोन आधीच वेगवेगळ्या बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे या फोनचे स्पेसिफिकेशन्स माहिती आहेत. Moto G71 मध्ये 6.4-इंचांचा फुल-HD+ OLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. डिस्प्ले 60hz च्या स्टँडर्ड रिफ्रेश रेटसह येतो. Moto G71 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC सह सुसज्ज आहे. यात 8GB RAM आणि 128GB एक्सपेंडेबल स्टोरेज आहे जी मायक्रोएसडी कार्ड वापरून वाढवता येते.

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर समाविष्ट आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसांठी याच्या फ्रंटला 16-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

इतर बातम्या

Google | वृत्त संकलनातील एकाधिकारशाहीचा दुरुपयोग, गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश

शानदार ऑफर! Oppo चा 12 हजारांचा स्मार्टफोन 9 हजार रुपयांत खरेदीची संधी

कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

(Moto G71 5G launching todays, know price and features)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.