50MP कॅमेरा, OLED डिस्प्लेसह Moto G71 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोटोरोला भारतात एकापाठोपाठ एक नवीन प्रोडक्ट्स लाँच करत आहे. Moto G31 आणि Moto G51 लाँच केल्यानंतर, Motorola कंपनी लवकरच Moto G71 हा स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लाँच करू शकते.

50MP कॅमेरा, OLED डिस्प्लेसह Moto G71 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Moto G71
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 6:00 AM

मुंबई : मोटोरोला भारतात एकापाठोपाठ एक नवीन प्रोडक्ट्स लाँच करत आहे. Moto G31 आणि Moto G51 लाँच केल्यानंतर, Motorola कंपनी लवकरच Moto G71 हा स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लाँच करू शकते. लेनोवोच्या मालकीच्या कंपनीने जागतिक बाजारात एकूण पाच स्मार्टफोन लॉन्च केले होते. भारतात आतापर्यंत पाचपैकी फक्त दोनच स्मार्टफोन्सचे अनावरण झाले आहेत. (Moto G71 ready to launch in India, will come with 50MP camera and OLED display)

दरम्यान, आता अशी बातमी समोर आली आहे की, स्नॅपड्रॅगन 695, FHD+ OLED डिस्प्ले सह Moto G71 लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. Moto G71 हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 695 सह लाँच केला जाऊ शकतो. Moto G71 युरोपमध्ये 299.99 युरो (जवळपास 25,200 रुपये) किंमतीसह लाँच करण्यात आला. चीनी बाजारात, स्मार्टफोनची किंमत 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी 1,699 (जवळपास 20,000 रुपये) होती. भारतातही या स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

Moto G71 चे संभाव्य स्पेक्स

हा स्मार्टफोन आधीच वेगवेगळ्या बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे या फोनचे स्पेसिफिकेशन्स माहिती आहेत. Moto G71 मध्ये 6.4-इंचांचा फुल-HD+ OLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. डिस्प्ले 60hz च्या स्टँडर्ड रिफ्रेश रेटसह येतो. Moto G71 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC सह सुसज्ज आहे. यात 8GB RAM आणि 128GB एक्सपेंडेबल स्टोरेज आहे जी मायक्रोएसडी कार्ड वापरून वाढवता येते.

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर समाविष्ट आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसांठी याच्या फ्रंटला 16-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

इतर बातम्या

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

(Moto G71 ready to launch in India, will come with 50MP camera and OLED display)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.