128 जीबी स्टोरेज आणि 6000mAh ची बॅटरी, किंमत अवघी 11,999, Moto चा दमदार फोन लाँच

मोटोरोला (Motorola) कंपनीने मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतात मोटो G9 पॉवर (Moto G9 Power) हा किफायतशीर स्मार्टफोन लाँच केला आहे.

128 जीबी स्टोरेज आणि 6000mAh ची बॅटरी, किंमत अवघी 11,999, Moto चा दमदार फोन लाँच
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 11:38 PM

मुंबई : मोटोरोला (Motorola) कंपनीने मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतात मोटो G9 पॉवर (Moto G9 Power) हा स्मार्टफोन लाँच केला आहे. मोठी स्क्रीन, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि ट्रिपल कॅमेरा हे या फोनचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. कंपनीने मोटो G9 पॉवर हा स्मार्टफोन सर्वप्रथम युरोपियन मार्केटमध्ये लाँच केला होता. तिथे या फोनला मोठी पसंती मिळाल्यानंतर हा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असून भारतात शाओमी, रियलमी, ओप्पो आणि इतर स्मार्टफोन कंपन्यांना जोरदार टक्कर देणार आहे. (Moto G9 Power launched with Qualcomm Snapdragon 662 price starts at Rs 11999)

किंमत

मोटो G9 पॉवर हा स्मार्टफोन भारतात 11,999 रुपये या किंमतीसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 15 डिसेंबर दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

फ्लिपकार्ट HDFC क्रेडिट कार्ड होल्डर्सना या फोनवर 1750 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर तुम्हाला हा स्मार्टफोन अवघ्या 10,249 रुपयांमध्ये मिळेल. तसेच इतर बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवरही काही ऑफर्स दिल्या जाणार आहेत. तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन रिप्लेस केलात तर तुम्हाला अजूनच कमी किंमतीत हा फोन मिळेल. त्यामुळे किंमतीत अजून 1 ते 3 हजार रुपयांचा फरक पडेल.

स्पेसिफिकेशन

मोटो G9 पॉवर या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचांचा HD+IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 720×1,640 पिक्सल रेजॉल्यूशनसह येतो. मोटो G9 पॉवरमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅग 662 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेससह दिला जातो. या फोनची मेमरी तुम्ही एक्स्टर्नल मेमरी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवू शकता.

या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यापैकी पहिला कॅमेरा सेन्सर हा 64 मेगापिक्सल्सचा आहे. सोबत 2 मेगापिक्सलचा का मायक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) 16 मेगापिक्सल्सचा आहे. सोबतच फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

संबंधित बातम्या

48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Vivo चा दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत

ना 100, ना 200, सॅमसंग आणणार तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन, व्हिडीओ रेकॉर्डिंगची क्वालिटीही भन्नाट

Micromax चा ‘हा’ किफायतशीर स्मार्टफोन 10 डिसेंबरपासून विक्रीस उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Moto G9 Power launched with Qualcomm Snapdragon 662 price starts at Rs 11999)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.