Motorola Edge 2022 झाला लाँच, पॉवरफुल प्रोसेसरसह 4 वर्षांपर्यंत मिळणार अपडेटस

शानदार डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसर सह मोटोरोला ब्रँडचा नवा स्मार्टफोन ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये काय फीचर्स आहेत आणि त्याची किंमत किती आहे, हे जाणून घेऊया.

Motorola Edge 2022 झाला लाँच, पॉवरफुल प्रोसेसरसह 4 वर्षांपर्यंत मिळणार अपडेटस
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 3:19 PM

Motorola Edge 2022: मोटोरोला कंपनीने (Motorola company) ग्राहकांसाठी बाजारात नवा स्मार्टफोन (new smartphone launched) लाँच केला आहे. Motorola Edge 2022 असे त्याचे नाव आहे. या स्मार्टफोनच्या विशेष फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये ॲंड्रॉईड 12 ऑपरेटिंग (android 12) सिस्टीम आहे. एवढंच नव्हे तर या स्मार्टफोनमध्ये 3 वर्षांपर्यंत ओएस अपडेट आणि 4 वर्षापर्यंत दर महिन्याला 2 वेळा सिक्युरिटी अपडेटस ( 4 years of updates) देण्यात येतील, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. मोटोरोला एज 2022 हा फोन ग्राहकांसाठी काळ्या रंगात उपलब्ध असेल. मोटोरोला कंपनीच्या या नव्या फोनमध्ये फीचर्स काय आहेत आणि त्याची बाजारात किंमत (features and price) किती असेल, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

डिस्प्ले : मोटोरोला एज 2022 हा फोन 144 हर्ट्स रिफ्रेश रेट सह 6.6 इंचांच्या फुल- एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) ओलेड डिस्प्लेसह येतो. हा स्मार्टफोन एचडीआर 10 प्लसला सपोर्ट करतो.

प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंग यासाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 1050 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

सॉफ्टवेअर : हा नवा स्मार्टफोन ॲंड्रॉईड 12 वर आधारित माय युएक्स इंटरफेस सह काम करतो.

कॅमेरा सेन्सर : मोटोरोला एज 2022 या फोनच्या बॅक पॅनेलवर तीन रेअर कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईट ॲंगल लेन्स आणि एक डेप्थ कॅमेरा सेन्सर असेल. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंग सुविधेसाठी या फोनच्या पुढच्या बाजूस 32 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर लावण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटी : या स्मार्टफोनमध्ये ड्युएल स्टीरिओ स्पीकर्स आहेत, तसेच तीन मायक्रोफोन्स देण्यात आले आहेत. तसेच या डिव्हाईसमध्ये एनएफसी सपोर्ट आणि ब्ल्यूटूथ व्हर्जन 5.2 देण्यात आले आहे.

बॅटरी क्षमता : या नव्या स्मार्टफोनमध्ये 30 वॉट टर्बोपॉवर वायर्ड चार्जिंग, 5 वॉट रिव्हर्स चार्जिंग और 15 वॉट वायरलेस चार्जिंग, यासह 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

डायमेन्शन : या फोनची लांबी – रुंदी 160.86×74.24×7.99 मिलीमीटर इतकी आहे. तर त्याचे वजन 170 ग्रॅम आहे.

किंमत : मोटोरोला एज 2022 या स्मार्टफोनची किंमत 499.99 डॉलर ( अंदाजे 40,000 रुपये) आहे. ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन काळ्या रंगात उपलब्ध असेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.