888+ चिपसेटसह मोटोरोला महिना अखेरीस Moto G200 लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोटोरोला कंपनी लवकरच आपल्या सर्वोत्तम स्मार्टफोनपैकी एक फोन भारतात लाँच करु शकते. Moto G200 असे या स्मार्टफोनचे नाव असेल जो जागतिक बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच झाला आहे.

888+ चिपसेटसह मोटोरोला महिना अखेरीस Moto G200 लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Moto G200
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 6:30 AM

मुंबई : मोटोरोला कंपनी लवकरच आपल्या सर्वोत्तम स्मार्टफोनपैकी एक फोन भारतात लाँच करु शकते. Moto G200 असे या स्मार्टफोनचे नाव असेल जो जागतिक बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच झाला आहे, आता नोव्हेंबरच्या अखेरीस भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. Motorola ने भारतात डिव्हाइस लॉन्च करण्याची कोणतीही योजना शेअर केलेली नसली तरी, एका टिपस्टरने पुष्टी केली आहे की, स्नॅपड्रॅगन 888+ सह Motorola फोन नोव्हेंबरमध्ये भारतात लॉन्च केला जाईल. Moto G200 व्यतिरिक्त, Motorola भारतात बजेट रेंजमध्ये Moto G71, G51 आणि Moto G31 लाँच करण्याचा विचार करत आहे. तिन्ही मॉडेल्स युरोपमध्ये लॉन्च करण्यात आले होते. (Motorola to launch Moto G200 in India in November 30)

टिपस्टर देबायन रॉय यांनी सांगितले की मोटोरोला 30 नोव्हेंबर रोजी भारतात स्नॅपड्रॅगन 888+ सह स्मार्टफोन लॉन्च करेल. त्यांनी स्मार्टफोनचे नाव जाहीर केले नसले तरी, Moto G200 हे एकमेव नाव आहे जे नुकतेच जागतिक बाजारपेठेत अधिकृत केले गेले आहे. टिपस्टरने लिहिले आहे की, “स्नॅपड्रॅगन 888+ सह एक नवीन मोटोरोला स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होत आहे. नवीन Moto फोनची भारतात लॉन्च करण्याची निश्चित तारीख 30 नोव्हेंबर आहे.

Moto G200 किंमत आणि उपलब्धता

Moto G200 हा फोन 450 युरो (जवळपास 37,900 रुपये) इतक्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. आणि सध्या लॅटिन अमेरिकेत खरेदीसाठी उपलब्ध आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत जवळपास 35,000 रुपये असू शकते.

मोटो G200 चे स्पेसिफिकेशन्स

या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास Moto G200 मध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. Moto G200 मध्ये Qualcomm Snapdragon 888+ SoC, 8GB RAM आणि 256GB RAM चा सपोर्ट आहे. स्मार्टफोन एकाच रॅम व्हेरिएंटमध्ये येत असला तरी, तो दोन स्टोरेज व्हेरिएंटसह येतो, ज्यामध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज समाविष्ट आहे.

या फोनच्या कॅमेरा फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, Moto G200 मध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा सोबत 13MP अल्ट्रा वाइड मॅक्रो कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी यामध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोन 8K व्हिडीओ, 960 fps स्लो मोशन व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ रेकॉर्डिंग पर्यायांना सपोर्ट करतो. Moto G200 मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

इतर बातम्या

जगातील पहिला 18GB रॅम स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या याची खासियत

तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी ‘हा’ पासवर्ड वापरत नाही ना? काही सेकंदात होऊ शकतो हॅक

आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये

(Motorola to launch Moto G200 in India in November 30)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.