मुकेश अंबानींचा दिवाळी धमाका, Jio यूजर्सला मिळणार वर्षभर मोफत इंटरनेट, असा घेता येईल फायदा

Mukesh Ambani Jio free data offer: Jio Air Fiber युजर इंटरनेटसाठी दिवाळी प्लॅन रिचार्ज केला तर त्यांना वर्षभरासाठी सबस्क्रिप्शन मिळेल. रिचार्ज केल्यानंतर त्यांना 12 कूपन दिले जातील. ते दर महिन्याला इंटरनेटसाठी वापरू शकतात.

मुकेश अंबानींचा दिवाळी धमाका, Jio यूजर्सला मिळणार वर्षभर मोफत इंटरनेट, असा घेता येईल फायदा
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 10:07 AM

Mukesh Ambani Jio free data offer: मोबाईलचा वापर वाढत असल्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचे 49 कोटी ग्राहक भारतात आहे. त्यांच्यासाठी मुकेश अंबानी यांनी वर्षभर इंटरनेट मोफतची योजना आणली आहे. या ऑफरनुसार कंपनी वर्षभर मोफत इंटरनेट देणार आहे. 3 नोव्हेंबरपर्यंत या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर विद्यामान ग्राहक आणि नवीन ग्राहक दोघांसाठी आहे. मोफत इंटरनेटसोबत युजरला OTT चाही लाभ मिळणार आहे.

काय आहे योजना

जिओची ही दिवाळी ऑफर रिलायन्स डिजिटल किंवा MyJio Store मधून खरेदी करणाऱ्या युजरसाठी आहे. जिओच्या या दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 20,000 रुपयांपर्यंतची खरेदी केल्यावर मोफत इंटरनेट सुविधा मिळणार आहे. युजर्स 5G मिळणार आहे. तसेच 3 महिन्यांचा Jio AirFiber दिवाळी प्लॅन युजर्सना 2,222 रुपयांमध्ये उपलब्ध मिळणार आहे.

Jio Air Fiber युजर इंटरनेटसाठी दिवाळी प्लॅन रिचार्ज केला तर त्यांना वर्षभरासाठी सबस्क्रिप्शन मिळेल. रिचार्ज केल्यानंतर त्यांना 12 कूपन दिले जातील. ते दर महिन्याला इंटरनेटसाठी वापरू शकतात. वापरकर्त्यांना नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान हे कूपन वापरावे लागतील.

हे सुद्धा वाचा

या दोन प्लॅनवर ऑफर

जिओने दोन प्लॅनसोबत गिफ्ट व्हाऊचर ऑफर दिले आहेत. या व्हाऊचरचा लाभ युजर ट्रॅव्हल पोर्टल, फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर करु शकणार आहे. तसेच JioAirFiber चे वर्षभराचे फ्री सब्सक्रिप्शन या ऑफरमध्ये आहे. त्यासाठी 899 रुपये किंवा 3,599 रुपयांचा प्लॅन रिचार्ज करावा लागणार आहे. 899 रुपये प्लॅन तीन महिन्यांसाठी आहे. त्यात रोज 2GB डेटा मिळतो. तसेच 20GB एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. म्हणजेच युजर्सला 200GB डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, डेली 100 फ्री SMS, नॅशनल रोमिंग मिळणार आहे.

3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. युजरला रोज 2.5GB डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, डेली 100 फ्री SMS, नॅशनल रोमिंग यासारख्या सुविधा मिळणार आहे. या दोन्ही ऑफर ऑफर 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.