WhatsApp : ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मध्ये येत आहे नवीन फीचर; आता स्टेट्सवरही हसऱ्या रडक्या… इमोजी पाठवून करा, आपल्या भावना व्यक्त…

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच नवीन क्विक रिअ‍ॅक्शन फीचर येणार आहे. नवीन फीचरमध्ये, युजर्संना आता इमोजीद्वारे आपल्या भावना अधिक जलदगतीने व्यक्त करता येणार आहेत.

WhatsApp : ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मध्ये येत आहे नवीन फीचर; आता स्टेट्सवरही हसऱ्या रडक्या... इमोजी पाठवून करा, आपल्या भावना व्यक्त...
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 2:00 PM

नवी दिल्ली : भारताता सर्वाधिक वापर होणारे मॅसेजींग अ‍ॅप व्हॉट्सअप (Messaging app WhatsApp) आपल्या युजर्संसाठी नेहमीच काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यांच्या या अपडेट्स च्या सीस्टीममुळेच युजर्सलाही इतर अ‍ॅप प्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप चा कंटाळा येत नाही. व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ‘इमोजी रिअ‍ॅक्शन फीचर’ ची घोषणा केली आहे. ज्याद्वारे, युजर्संना चॅटमधील मेसेजवर त्वरित प्रतिक्रिया (Quick response) देता येऊ शकेल. मेसेजिंग प्लॅटफॉर्म एका ‘क्विक रिअ‍ॅक्शन फीचर’ वर काम करत आहे जे युजर्संना WhatsApp वर स्टेटस अपडेट पाहताना इमोजी पाठवण्याची परवानगी देईल. हे फीचर आधीपासूनच इतर मेटा- प्लॅटफॉर्मवर उपलब्ध देखील आहे. Instagram आणि Messenger वर उपलब्ध हे फीचर उपलब्ध असून, आता व्हॉट्सअ‍ॅपवरही या फीचरला समाविष्ट करण्यात येत आहे. यामध्ये युजर्संना प्रतिक्रीया स्वरूपात, 8 विविध इमोजी (8 different emojis) देण्यात येणार आहेत.

मिळणार 8 इमोजी

भारतातील व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या रीपोर्टनुसार, मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म एका प्रतिक्रिया फीचर्सवर करत आहे. जे युजर्संना वैयक्तिक इमोजी संदेश म्हणून न पाठवता स्टेटस अपडेटवर प्रतिक्रिया देऊ शकेल. युजर्संना आठ इमोजी प्रतिक्रिया मिळतील व्हॉट्सअ‍ॅप संदेशावर प्रतिक्रिया देण्यासाठी आठ इमोजी ऑफर करेल. हार्टशेप आय स्माईली बरोबरच, आनंदाश्रूंचा चेहरा, उघड्या तोंडाचा चेहरा, रडणारा चेहरा, हात दुमडणे, टाळ्या वाजवणे, पार्टी पॉपर आणि शंभर पॉइंट इमोजी युजर्सला मिळेल. त्वरित प्रतिक्रियेत इमोजी कस्टमाइझ किंवा बदलण्यास सक्षम असतील की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. परंतु, रिपोर्टनुसार हे फीचर सध्या डेव्हलपमेंटमध्ये आहे. आणि येत्या काळात ते नवीन अपडेटमध्ये आणले जाईल.

फेसबुक, इन्स्ट्रावर आधिच उपलब्ध

WhatsApp व्यतिरिक्त, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवर स्टेटस किंवा स्टोरी अपडेटसाठी क्विक रिअ‍ॅक्शन फीचर्स आधीच उपलब्ध आहेत. हे फीचर युजर्संना Facebook आणि Instagram Story वर पोस्ट केलेल्या विशिष्ट सामग्रीबद्दल त्यांना कसे वाटते हे याबाबतची प्रतिक्रीया देण्यास उपलब्ध होते. मॅसेज रिप्लॅय निवडल्यानंतर, निवडलेल्या इमोजीसह एक अ‍ॅनिमेशन स्क्रीनवर दिसेल, आणि युजर्संना एक संदेश प्राप्त होईल जो सूचित करेल की तुम्ही स्टोरीला उत्तर दिले आहे. याशिवाय, प्रत्येकाच्या चॅटमधून त्रासदायक संदेश काढून टाकण्यासाठी ग्रुप अॅडमिन्ससाठी एका फीचरवरही व्हॉट्सअ‍ॅप काम करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी फाइल शेअरिंग मर्यादा 2GB पर्यंत वाढवत आहे आणि काही दिवसापूर्वीच 32 लोकांपर्यंत एक-टॅप व्हॉइस कॉलिंगही व्हॉट्सअ‍ॅपने सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.