Reliance Jio Phone Offer : केवळ 1999 रुपयात जिओ फोन, 2 वर्ष अनलिमिटेड कॉलिंग

नवा जिओ फोन 2021 (New Jio phone 2021 offer) अशी ही ऑफर आहे. यामध्ये केवळ 1999 रुपयात जिओ फोन खरेदीवर 2 वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग फ्री (Unlimited Calling) असेल.

Reliance Jio Phone Offer : केवळ 1999 रुपयात जिओ फोन, 2 वर्ष अनलिमिटेड कॉलिंग
आजपासून सुरु होत आहेत जिओच्या या तीन ऑफर
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 9:45 PM

Reliance Jio Phone New Offer : रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या जिओफोन युजर्ससाठी (Jio Users) नवी ऑफर आणली आहे. नवा जिओ फोन 2021 (New Jio phone 2021 offer) अशी ही ऑफर आहे. यामध्ये केवळ 1999 रुपयात जिओ फोन खरेदीवर 2 वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग फ्री (Unlimited Calling) असेल. इतकंच नाही तर महिन्याला 2 GB डेटाही (Unlimited Data) मिळेल. (New Reliance Jio phone 2021 offer launches offer phone plus 2 Years plan in 1999 Rs)

कंपनीने ही ऑफर तर लाँच केली आहेच. याशिवाय दुसरी एक ऑफर आहे. या ऑफरनुसार 1499 रुपयात जिओफोनसह 1 वर्षांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 2 GB डेटा मिळेल. या ऑफरसह कंपनीने सध्याच्या ग्राहकांचीही काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार 750 रुपयांच्या हप्त्यासह एका वर्षापर्यंत रिचार्जपासून मुक्ती मिळेल. शिवाय त्यांना अमर्यादित कॉलिंग आणि महिन्याला 2GB डेटा मिळेल.

या ऑफर देशभरात 1 मार्चपासून लागू होणार आहे. (Jio Phone 2021 Offer Date)

रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी (Akash Ambani) म्हणाले, “जग 5G क्रांतीच्या उंबरठ्यावर असताना, भारतातील 30 कोटी लोक अजूनही 2G मध्येच अडकले आहेत. इंटरनेट जगताच्या मूलभूत सुविधांपासून ते अजूनही वंचित आहेत. गेल्या 4 वर्षात जिओने इंटरनेट सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक भारतीयाला तंत्रज्ञानाचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. तंत्रज्ञान हे आता निवडक लोकांचा विशेषाधिकार राहिला नाही. जिओफोन 2021 हे आणखी एक पाऊल त्यासाठीच आहे. डिजीटल दरी मिटवण्याचं काम जिओकडून सुरुच राहील”

जिओने ही ऑफर 2G मुक्त भारतासाठी मोठं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. जिओफोन वापरकर्त्यांची संख्या 10 कोटी असल्याचं सांगितलं जातं. आता जिओची नजर त्या 30 कोटी युजर्सवर आहे, जे 2G फीचर फोन वापरतात. जिओच्या मते, देशात 30 कोटी 2G ग्राहक आहेत, त्यांच्या नेटवर्कची अवस्था दयनीय आहे.

संबंधित बातम्या 

या टॉप -5 यूपीआय अॅप्समधून करा पैसे ट्रान्सफर, देशात कुठेही पाठवू शकता पैसे

Vi चे सुपरफास्ट स्पीड प्लॅन, केवळ एका मिनिटात डाऊनलोड होणार चित्रपट

(New Reliance Jio phone 2021 offer launches offer phone plus 2 Years plan in 1999 Rs)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.