चमकोगिरीत भारतीय पुढे, उत्पन्न कमी तरी महागडे फोन खरेदीत करण्यात आघाडीवर
भारतीयांना स्मार्टफोनचे वेड जगात सर्वात जास्त आहे. महागडे स्मार्टफोन खरेदी करण्यात भारतीयांचा हात कोणी धरु शकत नाही. भारतातील प्रिमियम स्मार्टफोन मार्केट जगात सर्वात वाढणारे मार्केट आहे. आयफोन भारताचा सर्वात पसंतीचा प्रिमियम स्मार्टफोन ब्रॅंड आहे. भारतात सर्वाधिक आयफोनची विक्री होत आहे.
मुंबई | 3 जानेवारी 2024 : स्मार्टफोन ही काळाची गरज असली तरी आपल्या देशात महागडे स्मार्टफोन बाळगणे एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहीले जाते. त्यामुळे अनेकांचे उत्पन्न कमी असून त्यांच्या हातात महागडे फोन असल्याचे भारतात सर्रास पाहायला मिळत आहे. भारतीयांचे सरासरी उत्पन्न जगात खूपच मागे आहे. सरासरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण जगात तब्बल 142 व्या क्रमांकावर आहोत, परंतू महागडे स्मार्ट फोन खरेदी करण्याबाबत आपण वेगाने पुढे चाललो आहे. भारतातील वाढते मोबाईल पाहून आयफोनने कंपनीने देशातील महानगरात खास एप्पल स्टोअर उघडली आहेत. येथील आयफोनची विक्रीचे आकडे वाढतच चालले आहेत.
चीन, भारत, आफ्रीका आणि लॅटीन अमेरिका सारख्या देशात प्रिमियम मार्केटमध्ये स्मार्ट फोनची विक्री सर्वात जास्त आहे. परंतू भारत यात सर्वात पुढे आहे. याबाबतीत नवीन रेकॉर्ड पाहायला मिळत आहे. भारत जागतिक पातळीवर सर्वात वेगाने वाढणारे प्रिमियम स्मार्टफोन मार्केट बनला आहे. भारतीय नागरिकाचे दरडोई उत्पन्न अंगोला सारख्या देशापेक्षाही कमी आहे.अंगोला या देशाचे दरडोई उत्पन्न 3205 डॉलर आहे. तर भारतीयांचे दरडोई उत्पन्न 2601 डॉलर पेक्षा जास्त आहे. तर अमेरिकन नागरिकाचे दरडोई उत्पन्न 80,035 डॉलर आहे. परंतू अमेरिकन कंपनीचा आयफोन खरेदी करण्यात भारतीय पुढे चालले आहेत. भारतात प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये एप्पलची हिस्सेदारी सुमारे एक चतुर्थांश इतकी आहे.
महागड्या फोनमध्ये आयफोनची सद्दी
साल 2023 मध्ये भारताचे प्रिमियम स्मार्टफोन मार्केट वेगाने वाढत चालेले असल्याचे काऊंटर पॉइंटच्या अहवालात म्हटले आहे. प्रिमियम स्मार्टफोन मार्केटचा विचार करता साल 2023 मध्ये जगभराच्या सर्वाधिक प्रिमियम स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत एप्पल सर्वात पुढे आहे. परंतू एप्पलच्या मार्केट शेअरमध्ये घसरण झाली आहे. साल 2022 मध्ये एप्पलचे मार्केट शेअर 75 टक्के होते. ते साल 2023 मध्ये 71 टक्के झाले आहे. ग्लोबली प्रिमियम स्मार्टफोन मार्केट शेअरमध्ये दरवर्षी सहा टक्के वाढ होत आहे. एप्पल नंतर सॅमसंग दुसरा सर्वात जास्त विक्री होणारा प्रिमियम स्मार्टफोन आहे. सॅमसंगचा मार्केट शेअर समारे 17 टक्के आहे. जे गेल्यावर्षी 16 टक्के होते.