Nokia 8000 4G आणि नोकिया 6300 4G फिचर फोन लाँच, जाणून घ्या बजेट फोनची किंमत आणि फिचर्स

नोकिया कंपनीने Nokia 8000 4G आणि नोकिया 6300 4G हे दोन फिचर फोन भारतात लाँच केले आहेत.

Nokia 8000 4G आणि नोकिया 6300 4G फिचर फोन लाँच, जाणून घ्या बजेट फोनची किंमत आणि फिचर्स
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 11:26 PM

मुंबई : नोकिया (Nokia) कंपनीने काही दिवसांपूर्वी Nokia 8000 4G आणि नोकिया 6300 4G या दोन फिचर फोनची घोषणा केली होती. परंतु हे फोन कधी लाँच होणार, याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. आज कंपनीने हे दोन्ही 4जी फिचर फोन लाँच केले आहेत. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर आणि 1500mAh बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया 8000 4G मध्ये 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर नोकिया 6300 4G मध्ये VGA कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरादेखील फ्लॅशसह उपलब्ध आहे. (Nokia 8000 4G And Nokia 6300 4G feature phones launched in India)

नोकिया 8000 4G मध्ये 2.8 इंचांचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे, तर नोकिया 6300 4G मेध्ये 2.4 इंचांचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोन किपॅडद्वारे ऑपरेट होतात. नोकिया 8000 4G ची किंमत 6900 रुपये इतकी आहे, तर नोकिया 6300 4G ची किंमत 4300 रुपये इतकी आहे. नोकिया 8000 ब्लॅक, व्हाईट, ब्लू आणि गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर नोकिया 6300 4G ग्रीन, चारकोल आणि व्हाईट रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

दोन्ही फोनमध्ये डुअल सिम स्लॉट देण्यात आला आहे. नोकियाचे हे दोन फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर आणि 4 जीबी इंटर्नल स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहेत. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज स्पेस वाढवता येईल. या फोनमध्ये 512MB चा रॅम देण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5mm जॅकसह मायक्रो यूएसबी स्लॉट देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये FM रेडिओ आणि जीपीएस कनेक्टिव्हिटीदेखील आहे.

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G

इतर कंपन्या स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालत असताना नोकिय कंपनी अजूनही फिचर फोन बनवत आहे. गेल्या महिन्यात नोकियाने Nokia 215 4G आणि Nokia 225 4G हे दोन फिचर फोन भारतात लाँच केले होते. भारतात Nokia 215 ची किंमत 2,949 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Nokia 225 ची किंमत 3,499 रुपये इतकी आहे.

Nokia 215 हा फिचर फोन स्यान ग्रीन आणि ब्लॅक व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 2.4 इंचांचा QVGA डिस्प्ले आणि Unisoc UMS9117 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 64MB RAM आणि 128 MB इंटर्नल स्टोरेज (मेमरी) देण्यात आली आहे, जी microSD कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.

Series 30+ ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणाऱ्या या फिचर फोनमध्ये डुअल सिम सपोर्ट आणि 1150mAh इतक्या क्षमतेची रिमुव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही बॅटरी 19 तासांपर्यंत टॉक टाइम आणि 24 दिवसांपर्यंत स्टॅण्डबाय टाईम देईल. सोबतच या फोनमध्ये VGA कॅमरा, 3.5mm ऑडियो जॅक आणि FMradio चा सपोर्ट असेल.

संबंधित बातम्या

Diwali Sale : Realme 6 वर बंपर डिस्काऊंट, अवघ्या 9,999 रुपयांमध्ये खरेदी करा जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन!

48MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट

Nokia : या दोन फोनच्या किमतीत भरघोस कपात

Nokia 7.1 भारतात लाँच, किंमत आणि भन्नाट फीचर्स

(Nokia 8000 4G And Nokia 6300 4G feature phones launched in India; Check price and specifications)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.