8200 mAh स्ट्राँग बॅटरीसह Nokia T20 लाँच, जाणून घ्या स्पेक्स आणि किंमत
नोकियाचा बहुप्रतिक्षित अँड्राईड टॅब्लेट स्मार्टफोन अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. Nokia T20 हा नोकियाद्वारे लाँच करण्यात आलेला पहिला अँड्रॉईड टॅब्लेट आहे.
मुंबई : नोकियाचा बहुप्रतिक्षित अँड्राईड टॅब्लेट स्मार्टफोन अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. Nokia T20 हा नोकियाद्वारे लाँच करण्यात आलेला पहिला अँड्रॉईड टॅब्लेट आहे. या टॅब्लेटमध्ये 2K डिस्प्ले आहे. त्यासोबतच यात 8,200 एमएएचची बॅटरीदेखील दिली जाणार आहे. हा टॅब एकदा चार्ज केल्यानंतर 15 तास वापरता येतो हे याचे खास वैशिष्ट्ये आहे. विशेष म्हणजे Nokia T20 या टॅबमध्ये स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. तसेच यात ड्यूअल मायक्रोफोन्सही देण्यात आले आहे. (Nokia T20 launch with 8200 mAh strong battery, know specs and price)
Nokia T20 या टॅबच्या वाय-फाय व्हेरियंटची किंमत 15,499 रुपये आहे. यात तुम्हाला 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मिळणार आहे. तर 4 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ही 16499 रुपये आहे. तर यातील 4G व्हेरियंटची किंमत 18 हजार 499 रुपये आहे.
Nokia T20 हा टॅब Nokia.com या अधिकृत वेबसाईटवर आणि ऑफलाईन स्टोरवर आजपासून उपलब्ध केला जाणार आहे. तर फ्लिपकार्टवर उद्यापासून याची विक्री सुरु केली जाईल. विशेष म्हणजे यात Spotify चा प्रीलोडेड अॅक्सेस देण्यात आला आहे.
Nokia T20 हा टॅब अँड्राईड 11 वर काम करतो. यात 10.4 इंचाचा 2K डिस्प्ले देण्यात आला असून याचे पिक्सल रिझॉल्यूशन 2000×1200 इतके आहे. यात 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. त्यासोबत 64 जीबी स्टोरेज मिळणार आहे. या टॅबमध्ये 8 मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. यात OZO प्लेबॅक आणि स्टीरियो स्पिकर्सही मिळतील. तसेच या टॅबमध्ये नॉईस कॅन्सलेशनसोबतच मायक्रोफोन्सही देण्यात आले आहेत. याची बॅटरी 8200mAh इतकी असून त्याला 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.
इतर बातम्या
Watch a season of your favourite show in one go, or work and play throughout the day with the all-new Nokia T20 tablet. Launching – 1st November?#NokiaT20 #LoveTrustKeep #StayTuned pic.twitter.com/yl5WXnHE8I
— Nokia Mobile India (@NokiamobileIN) October 30, 2021
Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश
दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय
Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?
(Nokia T20 launch with 8200 mAh strong battery, know specs and price)