AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

नोकिया ब्रँडला HMD Global कडून परवाना मिळालेला आहे आणि या कंपनीने परवडणारा 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकियाच्या या फोनचे नाव Nokia X100 आहे. हा स्मार्टफोन Nokia X सीरीज Nokia X20, Nokia X10 आणि Nokia XR20 चा भाग आहे.

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत...
Nokia X100 5G
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 5:51 PM

मुंबई : नोकिया ब्रँडला HMD Global कडून परवाना मिळालेला आहे आणि या कंपनीने परवडणारा 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकियाच्या या फोनचे नाव Nokia X100 आहे. हा स्मार्टफोन Nokia X सीरीज Nokia X20, Nokia X10 आणि Nokia XR20 चा भाग आहे, पण या स्मार्टफोनची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे. Nokia X100 मोबाईल फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च झाला आहे. कंपनीने हा फोन नुकताच यूएस मार्केटमध्ये सादर केला असला तरी इतर देशांमध्ये कधी लॉन्च केला जाईल याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. (Nokia’s cheapest 5G smartphone Nokia X100 launched with 48MP camera and powerful features)

नोकिया X100 ची किंमत

नोकियाच्या या मोबाईलची किंमत 252 अमेरीकन डॉलर्स (जवळपास 18,700 रुपये) इतकी आहे आणि त्यात एक स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. हा फोन 19 नोव्हेंबरपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Nokia X100 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia X100 चे डिझाईन आणि प्रोसेसर नोकिया G300 सारखेच आहे, हा फोन नुकताच HMD Global ने सादर केला होते. या लेटेस्ट नोकिया फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर आहे, जो मिड रेंज 5G स्मार्टफोनसाठी एक शक्तिशाली चिपसेट आहे. हा फोन कंपनीचा एंट्री लेव्हल मोबाईल आहे.

Nokia X100 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. आवश्यक असल्यास वापरकर्ते एक्स्टर्नल मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकतात.

Nokia X100 चा कॅमेरा सेटअप

Nokia X100 च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे झाले तर याच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच, यात 5 मेगापिक्सल्सचा सेकेंडरी कॅमेरा आहे, जी एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तसेच यातील तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे, जो पंच होलमध्ये सेटअप आहे.

या परवडणाऱ्या नोकिया फोनमध्ये 4470mAh बॅटरी आहे, जी 18w फास्ट चार्जिंगसह येते. Nokia X100 स्मार्टफोन Android 11 वर काम करतो, तर Android 12 आता फोनसाठी उपलब्ध आहे. नोकियाच्या या फोनमध्ये OZO ऑडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, याच्या मदतीने ऑडिओ आणि व्हिडीओचा आवाज अधिक चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड करता येतो.

इतर बातम्या

सार्वजनिक वायफाय वापरताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; तुमचे खाते होऊ शकते हॅक

नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

(Nokia’s cheapest 5G smartphone Nokia X100 launched with 48MP camera and powerful features)

सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....