OnePlus 10 Pro पुढच्या आठवड्यात बाजारात, लाँचिंगआधीच कॅमेरा डिटेल्स, स्पेसिफिकेशन्स लीक

OnePlus कंपनी जानेवारीमध्ये OnePlus 10 Pro हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याची माहिती कंपनीच्या सीईओने स्वतः दिली होती. आता नवीन माहितीनुसार, OnePlus चा हा फ्लॅगशिप फोन 11 जानेवारीला बाजारात दाखल होऊ शकतो.

OnePlus 10 Pro पुढच्या आठवड्यात बाजारात, लाँचिंगआधीच कॅमेरा डिटेल्स, स्पेसिफिकेशन्स लीक
OnePlus 10 Pro
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 6:00 AM

मुंबई : OnePlus कंपनी जानेवारीमध्ये OnePlus 10 Pro हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याची माहिती कंपनीच्या सीईओने स्वतः दिली होती. आता नवीन माहितीनुसार, OnePlus चा हा फ्लॅगशिप फोन 11 जानेवारीला बाजारात दाखल होऊ शकतो. आता या फोनबद्दल एक नवीन टीझर व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये फोनचं डिझाईन आणि लॉन्च डेट समोर आली आहे. हा व्हिडिओ चीनी मायक्रोब्लॉगिंग साइट वीबोवर शेअर करण्यात आला आहे. (OnePlus 10 Pro may launch on 11th january, know specs and Camera details)

व्हिडिओमध्ये स्मार्टफोनची स्क्रीन दिसत आहे, जी पंच होल सेल्फी कॅमेरासह येते. यात वरच्या डाव्या बाजूला पंच होल कटआउट आहे. याच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, जो चौकोनी आकारात आहे. सर्वात अलीकडील लीक्समध्ये, मॉडेल क्रमांक NE2210 असलेले डिव्हाइस Geekbench पाहायला मिळाले आहे. टिपस्टरनुसार, हे डिव्हाइस OnePlus 10 Pro आहे.

लिस्टेड डिव्हाइस 976 च्या सिंगल कोर स्कोअरसह आणि 3469 च्या मल्टी-कोर स्कोअरसह येते. यासोबत, हे डिव्हाइस 12 GB रॅम, स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 चिपसेट आणि Android 12 OS सह लाँच होऊ शकतं. हा स्कोअर OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro च्या 1,100+ आणि 3,600+ स्कोअरपेक्षा कमी आहे. OnePlus 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळेल, जो 2K (2 हजार रिझोल्यूशन) सह बाजारात दाखल होईल. यात 120Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल, जो गेमिंग आणि स्क्रोलिंग अनुभव सुधारतो. यात LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनमध्ये एक सिंगल होल कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो वरच्या डाव्या बाजूला आहे.

वनप्लस 10 प्रो मधील संभाव्य कॅमेरा सेटअप

डिजिटल चॅट स्टेशननुसार, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यापैकी प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल, तर सुपर वाईड अँगल कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल, तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे, जो 3X झूमसह सादर केला जाईल. यात सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

वनप्लस 10 प्रो मधील बॅटरी आणि चार्जिंग क्षमता

OnePlus 10 Pro च्या फास्ट चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन चार्ज करण्यासाठी 80W वायर फ्लॅश चार्ज मिळेल, तर 50W वायरलेस फ्लॅश चार्जर सपोर्ट उपलब्ध असेल. तसेच, हा फोन ColorOS 12 सिस्टमवर काम करेल, जो Android आधारित आहे.

वनप्लस 10 प्रो चा संभाव्य प्रोसेसर

OnePlus ने नेहमीच लेटेस्ट आणि फ्लॅगशिप प्रोसेसर वापरला आहे. यावेळी देखील कंपनी लेटेस्ट प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चा वापर करु शकते. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल.

इतर बातम्या

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

(OnePlus 10 Pro may launch on 11th january, know specs and Camera details)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.