OnePlus 9 स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत!, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
चीनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने जाहीर केले आहे की, वनप्लस 9 निम्म्या किंमतीत उपलब्ध होईल. भारतात 8 जीबी रॅम असलेल्या वनप्लस 9 च्या बेस मॉडेलची किंमत 49,999 रुपये इतकी आहे.
मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने जाहीर केले आहे की, वनप्लस 9 निम्म्या किंमतीत उपलब्ध होईल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर भारतात 8 जीबी रॅम असलेल्या वनप्लस 9 च्या बेस मॉडेलची किंमत 49,999 रुपये इतकी आहे. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह वनप्लस 9 च्या टॉप-एंड मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे. कंपनीने वनप्लस 9 च्या खरेदीवर ऑफर सादर केली आहे. कंपनीने याबद्दल ट्विट केले आहे. (OnePlus 9 smartphone available with half price; check Offer)
तथापि, ही डील कॅचसह येते. वनप्लस 9 वर 50% सूट फक्त युनायटेड स्टेट्स मध्ये टी-मोबाइलद्वारे उपलब्ध आहे. भारतात OnePlus 9 5G स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी इंटर्नल स्टोरेजचा समावेश आहे. स्मार्टफोन तीन कलर पर्यायांमध्ये येतो ज्यात अॅस्ट्रल ब्लॅक, आर्कटिक स्काय आणि विंटर मिस्टचा समावेश आहे.
जर तुम्हाला भारतात डिस्काऊंटसह वनप्लस 9 खरेदी करायचा असेल तर निराश होऊ नका, भारतातही अनेक सवलतीच्या ऑफर उपलब्ध आहेत. तुम्ही अमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून किंवा वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवरून वनप्लस 9 खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन खरेदीसाठी तुम्ही जर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डचा वापर केलात आणि ईएमआय व्यवहार केला तर 3,000 रुपयांपर्यंत सूट, निवडक अमेरिकन एक्सप्रेस कार्डवर 10 टक्के कॅशबॅक आणि एचडीएफसी बँक कार्डसह 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय ऑफरसह उपलब्ध आहे.
Half off. Literally. Get the OnePlus 9 for 50% OFF. https://t.co/O029HjXT0p pic.twitter.com/DRRzU3SmkZ
— OnePlus➕ (@OnePlus_USA) August 11, 2021
OnePlus 9 चे फीचर्स
हे स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम चालता. वनप्लस 9 मध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 20.9 आहे. रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे. वनप्लस 9 मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज स्पेस वाढवता येईल. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिली आहे. वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत 50 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.
इतर बातम्या
आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध
भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार
रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(OnePlus 9 smartphone available with half price; check Offer)