OnePlus Nord 2T ची भारतातली किंमत लीक, एप्रिलमध्ये बाजारात, जाणून घ्या नव्या फोनची खासियत

वनप्लस नॉर्ड 2 टी (OnePlus Nord 2T) एप्रिल किंवा मे महिन्यात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. एका अहवालानुसार हा फोन वनप्लस नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) ची जागा घेईल. दरम्यान, भारतातील या स्मार्टफोनची किंमतही समोर आली आहे.

OnePlus Nord 2T ची भारतातली किंमत लीक, एप्रिलमध्ये बाजारात, जाणून घ्या नव्या फोनची खासियत
OnePlus Nord 2 (PS- OnePlus)
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 5:11 PM

मुंबई : वनप्लस नॉर्ड 2 टी (OnePlus Nord 2T) एप्रिल किंवा मे महिन्यात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. एका अहवालानुसार हा फोन वनप्लस नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) ची जागा घेईल. दरम्यान, भारतातील या स्मार्टफोनची किंमतही समोर आली आहे. स्मार्टफोनचे ठराविक स्पेसिफिकेशन्स आणि डिझाइन पार्ट्स लीक झाल्यानंतर काही दिवसांनी ही बातमी आली आहे. दरम्यान, कथित वनप्लस नॉर्ड 2 सीई (OnePlus Nord 2 CE) ची किंमत देखील ऑनलाइन नोंदवली गेली आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 11 फेब्रुवारीला लॉन्च होईल असा दावा करण्यात आला आहे. टिपस्टर योगेश ब्रारच्या दाव्यांचा हवाला देत, 91Mobiles ने अहवाल दिला आहे की, OnePlus Nord 2T एप्रिल किंवा मे मध्ये 30,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाईल.

अहवालात असे म्हटले आहे की, OnePlus Nord 2T च्या बेस व्हेरिएंटची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल. शिवाय, ब्रार यांनी दावा केला आहे की, OnePlus Nord 2T हा स्मार्टफो OnePlus Nord 2 ची जागा घेईल. याचा अर्थ असा होऊ शकतो की OnePlus Nord 2T लाँच झाल्यानंतर OnePlus Nord 2 बंद होईल.

OnePlus Nord 2T चे लीक्ड स्पेसिफिकेशन्स

अलीकडील एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, OnePlus Nord 2T स्मार्टफोन Android 12 आधारित OxygenOS 12 वर चालेल आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा फोन MediaTek Dimensity 1300 SoC सह 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येऊ शकतो. OnePlus Nord 2 प्रमाणेच फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह माहिती देण्यात आली आहे. OnePlus Nord 2T फोनला 80W SuperVOOC फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh क्षमतेची बॅटरी मिळेल असा खुलासा झाला आहे.

OnePlus Nord 2 CE ची किंमत

OnePlus Nord 2 CE बद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हा स्मार्टफोन 11 फेब्रुवारी रोजी 25,000 ते 30,000 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च केला जाईल. या फोनची लॉन्च डेट तीच आहे जी टिपस्टर मॅक्स जॅम्बोरने लीक केली होती. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या वेबसाइटवर हा स्मार्टफोन पाहायला मिळाला आहे, ज्याचा मॉडेल क्रमांक IV2201 आहे.

इतर बातम्या

11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स

PHOTO | फिटनेस प्रेमींसाठी लवकरच भारतात येतोय Redmi Smart Band pro.; मोठ्या डिस्प्लेसोबत आहेत आकर्षक फीचर्स !

ओप्पोच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज…फास्ट चार्जिंग मोबाईलच्या जगात आता ओप्पो ठेवणार पाय, स्मार्टफोन झटपट चार्ज होणार!

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.