ठरलं! दमदार प्रोसेसर, 64MP कॅमेरासह Oneplus Nord CE 5G ‘या’ दिवशी लाँच होणार

Oneplus Nord CE 5G स्मार्टफोन 10 जूनला लाँच केला जाणार आहे. सकाळी 7 वाजता या फोनच्या लाँचिंग इव्हेंटला सुरुवात होईल.

ठरलं! दमदार प्रोसेसर, 64MP कॅमेरासह Oneplus Nord CE 5G 'या' दिवशी लाँच होणार
OnePlus Nord
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 4:28 PM

मुंबई : Oneplus Nord CE 5G स्मार्टफोन 10 जूनला लाँच केला जाणार आहे. सकाळी 7 वाजता या फोनच्या लाँचिंग इव्हेंटला सुरुवात होईल. लाँच होण्यापूर्वीच हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर सूचीबद्ध झाला आहे. या फोनची लाँचिंग डेट आणि वेळ जाहीर करण्याबरोबरच अ‍ॅमेझॉनवर फोनचे फीचर्स सादर करण्यात आले आहेत. अमेझॉनवरील लिस्टिंग पेजवर Notify Me हे बटणदेखील देण्यात आलं आहे. त्यावर क्लिक करून आपण स्मार्टफोनच्या लाँचिंगबद्दल अधिक अपडेट्स मिळवू शकता. (OnePlus Nord CE 5G is ready to launch on 10th june; check features)

वनप्लस कंपनी या स्मार्टफोनबद्दल सातत्याने ट्विटरवर टीझ करत आहे. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे आणि यामध्ये CE म्हणजेच कोर एडिशन आहे.‘Core. A Little more than you’d expect.’ या टॅगलाईनसह हा फोन लाँच केला जाईल. Android Central च्या अहवालानुसार हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी चिपसेटने पॉवर्ड असेल. वनप्लस नॉर्ड Qualcomm Snapdragon 765G प्रोसेसरसह सुसज्ज असेल.

OnePlus Nord CE 5G चे संभाव्य फीचर्स

मिळालेल्या माहितीनुसार OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरासह येईल. यासोबत यात 6.43 इंचांचा AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे आणि याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असेल. सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटला पंच-होल कॅमेरा असेल, ज्यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

OnePlus TV U1S Smart TV लाँच होणार

OnePlus कंपनी Nord CE 5G सह एक नवीन टीव्हीदेखील लाँच करेल, जो U Series अंतर्गत सादर केला जाईल. या स्मार्ट टीव्हीचं नाव OnePlus TV U1S Smart TV असं असेल. हा टीव्ही 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचांच्या तीन स्क्रीन साईजमध्ये लाँच केला जाईल. यासह यामध्ये 60Hz रिफ्रेश रेट मिळेल. या टीव्हीध्ये HDR10+, HLG आणि MEMC video फॉरमॅट सपोर्ट असेल. साउंड आऊटपुटसाठी यामध्ये 30W स्पीकर दिला जाईल जो डॉल्बी अॅट्मॉस साउंडसह येईल.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(OnePlus Nord CE 5G is ready to launch on 10th june; check features)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.