5G लाँचिंगनंतरही देशात 4G चा दबदबा कायम राहणार, Ookla च्या अहवालात मोठा खुलासा

दूरसंचार कंपन्या देशात 2022 पर्यंत व्यावसायिक वापरासाठी 5G नेटवर्क आणू शकतात. पण Ookla च्या अहवालात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

5G लाँचिंगनंतरही देशात 4G चा दबदबा कायम राहणार, Ookla च्या अहवालात मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 7:56 PM

मुंबई : दूरसंचार कंपन्या देशात 2022 पर्यंत व्यावसायिक वापरासाठी 5G नेटवर्क आणू शकतात. पण Ookla च्या अहवालात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अहवालानुसार, 5G लाँच झाल्यानंतरही देशात 4G चेच वर्चस्व कायम राहील. आकडेवारीनुसार, 4G चा वापर भारतात सर्वाधिक आहे जेथे 2020 च्या चौथ्या तिमाहीत 93.5 टक्के होता, तर 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत तो 96 टक्क्यांवर पोहोचला आहे. 2020 मध्ये डाऊनलोड स्पीड 10.64 Mbps इतका होता, तर 2021 मध्ये 15.67 Mbps पर्यंत पोहोचला आहे. (Ookla report says 4G to remain dominant in India despite 5G launch)

ईटी टेलिकॉमच्या मते, ओक्लाचे (Ookla) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक डग सटल्स म्हणाले की, डेटाचा अर्थ असा आहे की बाजार अजूनही खूप मजबूत स्थितीत आहे आणि भारतात लॉन्च झाल्यावर येथील मार्केट 5G स्वीकारण्यास तयार आहे. ते पुढे म्हणाले की, भारतात 4G चे आधीच वर्चस्व आहे, त्यामुळे येत्या काही वर्षात बाजारात त्याची खूप महत्वाची भूमिका असेल. 5G लाँच केले तरीही ते तसेच राहील. आम्ही यापूर्वी 4G मध्ये थोडी सुधारणा पाहिली आहे. या वर्षी मार्चमध्ये स्पेक्ट्रम लिलाव झाल्यानंतर कंपन्यांनी अधिक स्पेक्ट्रम लावले आहेत.

भारतात 5G स्वीकारण्याची सुरुवात ओपन रेडिओ अॅक्सेस नेटवर्क, डायनॅमिक स्पेक्ट्रम शेअरिंग आणि परवडणाऱ्या 5G हँडसेटसह सुरू होईल. तथापि, सध्या देशात 5G चाचण्या सुरू झाल्या आहेत. एअरटेलने गुरुवारी म्हटले की, त्यांनी 5G वातावरणात भारताचे पहिले क्लाऊड-गेमिंग सेशन यशस्वीरीत्या आयोजित केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये, एअरटेलने हैदराबादमध्ये थेट 4G नेटवर्कवर 5G सेवा यशस्वीपणे सादर केली, हा एक उद्योग आहे. रिलायन्स जिओने आपल्या स्वदेशी बनावटीच्या उपकरणाचा वापर करून मुंबईत 5G चाचणी सुरू केली आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अद्याप भारतात 5G स्पेक्ट्रमसाठी लिलाव आयोजित करणे बाकी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीला सूचित करण्यात आले होते की 2022 पर्यंत काही प्रमाणात अत्यावश्यक वापरासाठी 5G भारतात आणले जाईल कारण भारतात 4G किमान 5-6 वर्षे सुरु राहण्याची अपेक्षा आहे. 5G तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना जबरदस्त स्पीड आणि उत्तम युजर एक्स्पीरियन्स मिळेल.

काय आहे 5G?

5 जी म्हणजे मोबाइल नेटवर्कची 5 वी पिढी (5th Generation). वेगवान इंटरनेट स्पीड, अखंडित एचडी सर्फिंग, उत्कृष्ट सेवा आणि बरेच काही. भारत सरकारने 5G चाचणीला परवानगी दिली, टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. भारती एअरटेलनेही 5 जी नेटवर्कची चाचणी सुरु केली आहे.

वास्तविक, 5 जी तंत्रज्ञान ही सेल्युलर सेवेतील लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे. याला 4 जी नेटवर्कची पुढील आवृत्ती म्हटले जाऊ शकते. यात वापरकर्त्यांना अधिक इंटरनेट स्पीड, कमी लेटेंसी आणि अधिक फ्लेक्सिबिलिटी पहायला मिळेल. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असे, परंतु 5 जी सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल.

इतर बातम्या

कमी किंमत आणि 6000mAh बॅटरीसह Redmi 10 Prime भारतात लाँच

Samsung Galaxy M32 5G बाजारात, आजपासून सेल सुरु, जाणून घ्या किती आहे 5G फोनची किंमत

वर्षअखेरीस Samsung सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

(Ookla report says 4G to remain dominant in India despite 5G launch)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.