Oppo : जबरदस्त ऑफर्स… दरमहा केवळ 564 रुपये देऊन ओप्पोचा ‘हा’ स्मार्टफोन घरी आणा!
जर तुम्हाला नवीन फोन घ्यायचा असेल आणि तोही तुमच्या बजेटमध्ये हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ओप्पोचा Oppo A54 हा स्मार्टफोन तुम्ही दर महिन्याला वाजवी किंमत भरुन घरी आणू शकणार आहात. या स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई : तुम्हाला जर एखादी बजेट स्मार्टफोन घ्यायचा असेल तर अशा ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर्स आली आहे. ओप्पो ए 54 (Oppo A54) हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या ॲमेझॉन (Amazon) वर अत्यंत वाजवी किमतीत खरेदी करता येईल. या फोनचा 6 जीबी रॅम व्हेरिएंट सर्व डिस्काउंट ऑफरसह 1,940 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनवर 10,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर (Exchange Offers) देण्यात येत आहे. जर तुम्हालाही नवीन फोन घ्यायचा असेल आणि तोही बजेटमध्ये खरेदी करायचा असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे.
काय आहे ऑफर?
या स्मार्टफोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. यावर 6,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर फोनची किंमत 11,990 रुपये होईल. तुम्ही हा स्मार्टफोन EMI वरही खरेदी करू शकता. यासाठी ग्राहकांना दरमहा 564 रुपये द्यावे लागतील. जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्हाला 10,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर यूजर्सना हा फोन केवळ 1,940 रुपयांना मिळेल.
Oppo A54 चे फीचर्स
यात 6.51 इंचाचा एचडी प्लस पंच होल डिसप्ले देण्यात आलेला आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1600×720 आहे. या फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेंसर 13 मेगापिक्सेलचा असून दुसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेंस आहे. तिसरा 2 मेगापिक्सेल लेंससह आहे आणि चौथा AI लेंस आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर देण्यात आला आहे. हे Android 10 वर काम करतो. फोनमध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज आहे.
Oppo A54 5G चे स्पेसिफिकेशन्स
>> परफार्मेंस – MediaTek Helio P35 >> डिसप्ले – 6.51 इंच (16.54 सेमी) >> स्टोरेज – 64 जीबी >> कॅमेरा – 13 MP + 2 MP + 2 MP >> बॅटरी – 5000 mAh >> भारतात किंमत – 14990 >> रॅम – 4 जीबी