WhatsApp : तुमचं ही व्हॉटसॲप-टेलीग्राम होईल बंद? लाखो खाती का होणार सस्पेंड

WhatsApp : देशभरातील लाखो व्हॉटसॲप -टेलीग्राम खाते बंद होणार आहे. ही खाती थेट सस्पेंड होतील. यात तुमचं तर खातं नाही ना? हा फटका बसणार तरी कशामुळे?

WhatsApp : तुमचं ही व्हॉटसॲप-टेलीग्राम होईल बंद? लाखो खाती का होणार सस्पेंड
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 4:26 PM

नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : सोशल मीडिया अकाऊंटला ग्रहण लागले आहे. लवकरच देशातील लाखभर खाती बंद करण्यात येणार आहे. यामध्ये व्हॉटसॲप, टेलीग्राम, पेमेंट वॉलेट ॲप आणि वेबसाईटवर मोबाईल क्रमांकाने सक्रीय असणारी अगणित खाती बंद करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT) हा कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे एका झटक्यात सोशल मीडियाची खाती थेट सस्पेंड होतील. मंत्रालयाच्या या कारवाईने लाखो वापरकर्त्यांच्या मोबाईलमधील व्हॉटसॲप, टेलीग्राम, पेमेंट वॉलेट ॲप (WhatsApp, Telegram, Payment Wallet App) बंद होतील. ही खाती थेट सस्पेंड होतील. यात तुमचं तर खातं नाही ना? हा फटका बसणार तरी कशामुळे?

कशामुळे कारवाई

बोगस सिम कार्ड आधारे अनेक सोशल मीडिया ॲपचा वापर करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराला पायबंद घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकार लाखो सोशल आणि मॅसेजिंग खाती बंद करण्याच्या तयारीत आहेत.

हे सुद्धा वाचा

बनावट सिम हुडकले

पहिल्या टप्प्यात टेलिकॉम मंत्रालयाने बोगस सिम हुडकण्यासाठी मोहिम राबवली. संचार साथी नावाची वेबसाईट सुरु करण्यात आली होती. या संकेतस्थळावर लाखो भारतीयांना त्यांच्या नावावर किती सिम कार्ड आहेत आणि त्यातील किती बोगस आहेत, हे समजले.

50 लाख सिम कार्ड बंद

नवीन AI तंत्रज्ञानाआधारीत फेशियल रिकॉग्निशन टूल एएसटीआरचा उपयोग करण्यात आला. 2021मध्ये हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात 16.69 सिमपैकी 5 लाख सिम बनावट आढळले. त्यांना बंद करण्यात आले.

धक्कादायक आकडेवारी समोर

देशभरात फेक सिम कार्ड शोधण्याची मोहिम राबविण्यात आली. टप्प्याटप्प्याने ही मोहिम राबविण्यात आली. तेव्हा 60 लाख फेक सिम हुडकण्यात आले. आतापर्यंत त्यातील 50 लाख सिम बंद करण्यात आले. तर काही सिम क्रमांक निष्क्रिय करण्यात आले.

एका व्यक्तीकडे किती सिम?

Telecom Ministry नुसार, देशातील एक नागरिक त्याच्या नावावर 9 सिम खरेदी करु शकतो. पण हे सिम त्याच व्यक्तीने खरेदी केलेले असावेत. इतर कोणी त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करत सिम खरेदी करत असेल तर त्याचा मोठा फटका बसू शकतो.

नवीन तंत्रज्ञान कसे काम करते

एआय तंत्रज्ञानाच्या आधारे अगोदर सर्व सिम आणि त्याची कागदपत्रे तपासण्यात येतात. सिम खरेदीसाठी देण्यात येणारे छायाचित्र, ओळखपत्र, पत्ता, इतर तपशील याचा पडताळा करण्यात येतो. हे सिम कुठे कुठे वापरण्यात येत आहे, त्याची तपासणी होते. नकली सिम कार्ड बंद करण्यात येतात.

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.