महिन्याला केवळ 2 रुपये द्या आणि अमेझॉन प्राईमच्या या उत्कृष्ट सेवेचा फायदा घ्या; जाणून घ्या याबाद्दल सर्वकाही

सध्याची ऑफर नवीन आणि विद्यमान प्राइम वापरकर्त्यांना दोन रुपयात ऑडिबल सदस्यता घेण्यास अनुमती देईल. ही ऑफर चार महिन्यांसाठी असेल आणि 12 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान उपलब्ध असेल.

महिन्याला केवळ 2 रुपये द्या आणि अमेझॉन प्राईमच्या या उत्कृष्ट सेवेचा फायदा घ्या; जाणून घ्या याबाद्दल सर्वकाही
महिन्याला केवळ 2 रुपये द्या आणि अमेझॉन प्राईमच्या या उत्कृष्ट सेवेचा फायदा घ्या
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 7:52 AM

नवी दिल्ली : अमेझॉन इंडिया 26 जुलै आणि 27 जुलै रोजी होणाऱ्या प्राइम डे च्या विक्रीपूर्वी काही हायलाईट्स डील्सचा खुलासा करीत आहे. ई-कॉमर्स जाएंटने येथे वापरकर्त्यांसाठी पॉडकास्ट ऑडिओबुक्सचा खुलासा केला आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल 2021 डील्सबाबत बोलायचे तर वापरकर्त्यांना दरमहा 2 रुपयांमध्ये ऑडिबलचा अॅक्सेस मिळू शकतो. ऑडिबल अ‍ॅप वापरकर्त्यांना ऐकण्यासाठी ऑडिओबुक आणि पॉडकास्ट प्रदान करते, जे ते ऑफलाईन देखील अॅक्सेस करू शकतात. (Pay only Rs 2 per month and take advantage of this excellent service from Amazon Prime; know all about it)

दरमहा एक ऑडिओबुक ऐकण्यास मिळेल

याच्या किंमती वेगवेगळ्या असतात आणि किंमत आणि लेंथ विचारात न घेता वापरकर्त्यांना दरमहा एक ऑडिओबुक मोफत ऐकण्यास मिळते. सध्याची ऑफर नवीन आणि विद्यमान प्राइम वापरकर्त्यांना दोन रुपयात ऑडिबल सदस्यता घेण्यास अनुमती देईल. ही ऑफर चार महिन्यांसाठी असेल आणि 12 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान उपलब्ध असेल.

ऑफलाईनही ऐकू शकता ऑडिओबुक

ऑडिबल सब्सक्रिप्शन येथे दरमहा एक विनामूल्य ऑडिओबुक आणि ऑडिबल ओरिजिनल शो चे विनामूल्य अमर्यादित लिस्निंगही देते. म्हणजेच आपण ते ऑफलाईन देखील ऐकू शकता. आपण ते इको डिव्हाइसवर पुस्तके आणि पॉडकास्टच्या रूपात ऐकू शकता. 4 महिन्यांनंतर ऑडिबल वापरकर्त्यांना पेड मेंबरशिपवर स्थानांतरीत केले जाईल आणि त्यानंतर त्यांना दरमहा 199 रुपये शुल्क आकारले जाईल. यानंतर ते कोणत्याही वेळी त्यांचे सदस्यत्व रद्द करू शकतात.

ऑफर केवळ विद्यमान आणि नवीन प्राईम सदस्यांसाठीच लागू

अमेझॉन प्राइम मेंबर्सना 90 दिवसांसाठी विनामूल्य ऑडिओबुकमध्ये प्रवेश देते. अशा प्रकारे या ऑफरमुळे प्राईम सदस्यांना 30 दिवसांचा अतिरिक्त फायदा होतो. अ‍ॅमेझॉनने स्पष्ट केले आहे की, ही ऑफर केवळ विद्यमान आणि नवीन प्राईम सदस्यांसाठीच लागू आहे आणि विद्यमान ऑडिबल अ‍ॅप सदस्यांसाठी आणि मागील 45 दिवसात आपली ऑडिबल सदस्यता रद्द केलेल्या ग्राहकांसाठी वैध नाही. ऑफरचा लाभ घेण्यासाठी अमेझॉन प्राइम इंडिया ऑफर पेजला भेट द्या आणि गेट डील प्राप्त करा. यानंतर, वापरकर्ते थेट पेमेंट पेजवर जातील ज्यानंतर त्यांना ऑडिबल बुक्स आणि पॉडकास्टमध्ये प्रवेश मिळू शकेल.

26 आणि 27 ऑगस्ट रोजी प्राइम डे च्या विक्री दरम्यान, अमेझॉन स्मार्टफोन, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, उपकरणे, अमेझॉन डिव्हाईस, फॅशन आणि सौंदर्य, घर आणि स्वयंपाकघर, फर्निचर यासह अनेक श्रेणींमध्ये सूट देईल. सवलतीच्या व्यतिरिक्त काही कंपन्या प्राइम डे च्या विक्री दरम्यान आपली उत्पादने बाजारपेठेत आणण्यासही उत्सुक आहेत. (Pay only Rs 2 per month and take advantage of this excellent service from Amazon Prime; know all about it)

इतर बातम्या

GST Compensation: केंद्राकडून राज्यांना 75,000 कोटी जाहीर, पुढचा हप्ता कधी मिळणार?

कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड, पोलिसांनी हॉटेलमधून केली अटक

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.