पेटीएम पेमेंट्स बँकेची विक्रमी कामगिरी, दर महिन्याला 92.6 कोटी यूपीआय ट्रान्झॅक्शन्सचा टप्पा पार
पेटीएम पेमेंट्स बँक लि. (Paytm Payments Bank ltd. - PPBL) ही स्वदेशी बँक एकाच महिन्यामध्ये 926 मिलियन्सहून अधिक यूपीआय व्यवहारांचा टप्पा गाठणारी देशातील पहिली बेनिफिशियरी बँक ठरली आहे.
मुंबई : पेटीएम पेमेंट्स बँक लि. (Paytm Payments Bank ltd. – PPBL) ही स्वदेशी बँक एकाच महिन्यामध्ये 926 मिलियन्सहून अधिक यूपीआय व्यवहारांचा टप्पा गाठणारी देशातील पहिली बेनिफिशियरी बँक ठरली आहे. या यशामुळे भारतातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारी यूपीआय बेनिफिशिअरी बँक (UPI beneficiary bank) म्हणून या बँकेचे स्थान अधिकच भक्कम झाले आहे. व्यवहारांपोटी पैसे प्राप्त करणाऱ्या खातेधारकांच्या बँकेला बेनिफिशियरी बँक असे म्हटले जाते. व्यवहारापोटी येणे असलेली रक्कम पेटीएम पेमेन्ट्स बँकेच्या खात्यात जमा होण्याला आणि तिचा वापर दररोजच्या पेमेंट्ससाठी किंवा बचतीसाठी करण्याला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.
ऑक्टो-डिसेंबर 20 मध्ये झालेल्या 964.95 मिलियन्स बेनिफिशिअरी व्यवहारांच्या तुलनेत ऑक्टो-डिसें’21 च्या तिमाहीमध्ये पीपीबीएलने एकूण 2,507 मिलियन्स बेनिफिशियरी व्यवहारांची नोंद केली. संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये (मे वगळता) सर्वात मोठी यूपीआय बेनिफिशिअरी बँक हे आपले स्थान बँकेने टिकवून ठेवले असून तिच्या व्यवहारांमध्ये दर महिन्याला आधीच्या महिन्याच्या तुलनेत वाढ होत आहे.
2020 च्या तुलने व्यवहारांमध्ये 67 टक्के वाढ
पेटीएम पेमेंट्स बँकेने यूपीआय पेमेंट्ससाठीची रेमिटर बँक म्हणूनही वेगाने मजल गाठली आहे. ऑक्टो-डिसें’21 च्या तिमाहीमध्ये बँकेकडे 455.74 मिलियन्स रेमिटर व्यवहारांची नोंद झाली आहे. हा आकडा 2020 मधील याच कालावधीमध्ये झालेल्या व्यवहारांपेक्षा 67.26 टक्के अधिक आहे.
पेटीएमकडे सुसज्ज पायाभूत यंत्रणा
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे एमडी आणि सीईओ सतीश गुप्ता म्हणाले, “यूपीआय पेमेंटस्साठी सर्वाधिक पसंतीची बेनिफिशियरी बँक बनण्यामध्ये आमची मदत करणाऱ्या आमच्या यूजर्सकडून मिळालेल्या या हुरुप वाढविणाऱ्या प्रतिसादासमोर आम्ही नतमस्तक आहोत. सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सुसज्ज पायाभूत यंत्रणा आणि उच्च दर्जाचा डिजिटल बँकिंग अनुभव ग्राहकांना मिळावा यासाठी आमच्या टीमने केलेल्या कष्टांचेच हे द्योतक आहे. यापुढेही आपला अनुभव आणि तंत्रज्ञानाचे सामर्थ्य यांचा वापर करून ग्राहकांना अतिशय वेगवान यूपीआय मनी ट्रान्सफर सेवा आणि दररोजच्या पेमेंट्ससाठी पेटीएम वॉलेट आणि बँकखाते वापरण्याची सोय आम्ही ग्राहकांना पुरवित राहू.”
पेटीएमचे ग्राहकांसाठी पेटीएम ट्रान्झिट कार्ड
पेटीएम पेमेंट्स बँकेने अलीकडेच पेटीएम ट्रान्झिट कार्डही ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे. हे एनसीएमसी म्हणजे भारतीयांना एकाच कार्डामध्ये आपल्या प्रवासाशी संबंधित सर्व व्यवहार करण्याची सुविधा देऊ करते. हे कार्ड उपलब्ध झाल्याने आता यूजर्सना वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी कार्डस् जवळ बाळगण्याची गरज उरणार नाही आणि आपल्या सर्व पेमेंटस्साठी फक्त पेटीएम ट्रान्झिट कार्ड वापरणे पुरेसे ठरेल.
पेटीएमकडून सर्वाधिक फास्टॅग्स जारी
पेटीएम पेमेंट्स बँक ही भारतात फास्टॅग्स जारी करणारी अग्रगण्य बँक आहे व देशातील सर्वाधिक टोल प्लाझा हस्तगत करणाऱ्या बँकांपैकी एक आहे. पीपीबीएल फास्टॅग या टोल पेमेंट पद्धतीला देशामध्ये सर्वाधिक पसंती मिळत आहे, कारण त्यात यूजर्सना थेट आपल्या पेटीएम वॉलेटमधून पैसे भरता येतात. फास्टॅग्स वापरण्यासाठी किंवा रिचार्ज करण्यासाठी त्यांना कोणतेही वेगळे खाते तयार करण्याची गरज भासत नाही.
इतर बातम्या
7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय
ट्रिपल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरसह Realme 9i भारतात लाँच, किंमत…
Motorola चा नवीन Tablet बाजारात, Realme Pad, Samsung Tablet ला टक्कर
(Paytm Payments Bank receives over 926 million monthly transactions)