भारतीयांना Boycott China चा विसर, एका आठवड्यात Xiaomi च्या 50 लाख स्मार्टफोन्सची रेकॉर्डब्रेक विक्री

एका बाजूला देशात सातत्याने boycott china चा नारा दिला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात चिनी कंपन्या सातत्याने त्यांच्या वस्तूंची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत.

भारतीयांना Boycott China चा विसर, एका आठवड्यात Xiaomi च्या 50 लाख स्मार्टफोन्सची रेकॉर्डब्रेक विक्री
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 1:07 PM

मुंबई : एका बाजूला देशात सातत्याने boycott china, boycott chinese products चा नारा दिला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात चिनी कंपन्या सातत्याने त्यांच्या वस्तूंची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत. चिनी मोबाईल कंपनी शाओमी इंडियाने (Xiaomi India) या फेस्टिव्ह सीजनमध्ये देशभरातील मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. (people forgets Boycott China sentiments, Xiaomi India sold 50 lakh smartphones in a week)

मागील एका आठवड्यात शाओमीने भारतात 50 लाख स्मार्टफोनची विक्री करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. शाओमीच्या या यशात दोन ई-कॉमर्स वेबसाईट्सचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमुळे शाओमीला हा रेकॉर्ड बनवता आला.

यावेळी अमेझॉन आणि फ्लिपकार्टसोबत Mi.com द्वारे शाओमीच्या मोबाईल्सची मोठी विक्री झाली आहे. Mi.com ने देशात तब्बल 17,000 पिनकोड्सवर मोबाईल विक्री केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 15,000 किरकोळ भागिदारांनी दरवर्षीपेक्षा दुप्पट विक्री केली आहे.

एमआय इंडियाचे चीफ बिजनेस हेड रघु रेड्डी याबाबत म्हणाले की, “50 लाख स्मार्टफोन्सची विक्री करणे ही मोठी कामगिरी आहे. हे आकडे सांगतायत की ग्राहकांचा आमच्या प्रोडक्ट्सवर किती विश्वास आहे. देशात कोणत्याही स्मार्टफोन कंपनीला हे जमलेले नाही. ग्राहकांना चांगल्या किंमतीत उच्च प्रतीचे प्रोडक्ट विकणे हेच आमचे मुख्य टार्गेट आहे”.

गेल्या महिन्याभरात देशभरात विक्री झालेल्या चिनी मोबाईलची आकडेवारी पाहता, देशात ‘बॉयकॉट चायनीज’ची नुसती ओरड सुरु आसल्याचे निदर्शनास येत आहे. देशभरात सध्याच्या घडीला शाओमी, रेडमी, रियलमी, वनप्लस, पोको, वीवो आणि ओप्पो या चिनी ब्रॅण्डसच्या मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

भारतात रियलमी नारजो 20 सीरीजच्या 2.31 लाख मोबाईलची विक्री (realme narzo 20)

रियलमीच्या नुकत्याच लाँच झालेल्या नारजो 20 सीरीज या स्मार्टफोनने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बुधवारी कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार नारजो 20 सीरीजचे 2.31 लाख मोबाईल विकले गेले आहेत. 50 लाख भारतीयांना हा मोबाईल विकणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे.

तरुणांना नजरेसमोर ठेवून कंपनीने 23 सप्टेंबर रोजी नारजो 20 सीरीज फोन लाँच केला होता. या सीरीजमध्ये तीन फोन लाँच करण्यात आले आहेत. लेटेस्ट प्रोसेसर, फास्ट चार्जिंग आणि मोठी बॅटरी ही या फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

पहिल्याच सेलमध्ये 1.30 लाख Poco M2 मोबाईलची विक्री

भारतात चिनी फोनवरील बहिष्काराची हाक सातत्याने दिली जात आहे. त्यातच अजून एका चिनी कंपनीने भारतीय बाजारात धुमाकूळ घातला आहे. पोको एम 2 या मोबाईलच्या विक्रीसाठी कंपनीने 15 सप्टेंबर रोजी पहिल्या सेलचे आयोजन केले होते. या फोनच्या पहिल्याच सेलमध्ये 1.30 लाख पोको एम 2 या मोबाईल्सची विक्री झाली आहे.

या फोनचे दोन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 64 जीबी इंटर्नल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 10 हजार 999 रुपये तर 128 जीबी इंटर्नल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 12 हजार 499 रुपये इतकी आहे.

दरम्यान रेडमीचा नोट 9 (Redmi Note 9) या फोनचीदेखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे हा फोन सध्या आऊट ऑफ स्टॉक आहे.

संबंधित बातम्या

भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री

सणासुदीच्या मुहूर्तावर ‘हे’ पाच किफायतशीर स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फिचर्स

IPhone 12 आणि IPhone 12 pro साठी 23 ऑक्टोबरपासून प्री-बुकिंग सुरु, जाणून घ्या किमती आणि फिचर्स

iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!

(people forgets Boycott China sentiments, Xiaomi India sold 50 lakh smartphones in a week)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.